गुलाब शेख
उपसंपादक म.राज्य
मुखेड जि.नांदेड :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शहरातील स्मारकासाठी 50 लाख यासह विविध विकासकामासाठी 24 कोटी कोटी रुपये मंजुर झाले असल्याचे बालाजी पाटील खतगांवकर यांनी दि. 16 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती सांगितली.
यावेळी शंकर पाटील लुटे, नारायण गायकवाड,डॉ. रामराव श्रीरामे, सुभाष काटे,गंगाधर पाटील,शिवाजी गेडेवाड,शिवा मुद्देवाड, काशिनाथ हाक्के,साईनाथ बोईनवाड, सचिन रिंदकवाले यांची प्रमुख उपस्थिती होती. मुखेड - कंधार मतदारसंघातील पेठवडज हे गांव दत्तक घेतले असुन या भागात विपश्यना केंद्रासाठी 15 कोटी रुपये मंजुर झाले असुन तर शहरातील गणाचार्य मठसंस्थानला 1 कोटीसह विविध विकासकामासाठी साडेआठ कोटी रुपये मंजुर झाले. तालुक्यात 15 बंधारे मंजुर झाले.
तालुक्यात मोठा प्रश्न असलेला लेंडी प्रकल्प या कामासाठी 6.75 लाख प्रति हेक्टरी सानुग्रह अनुदान मंजुर झाले असुन उर्वरीत अनुदान सुध्दा मंजुर करुन आणणार व तालुक्यात रोजगारासाठी एमआयडीसी हे मोठे वरदान ठरणार आहे. याचे काम अंतिम टप्यात असून आगामी काळात हा सुध्दा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील असे खतगांवकर म्हणाले. यावेळी सचिन भिसे, सतिष डाकुरवार यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खतगांवकर यानी राज्य सरकारचे आभार मानले.
إرسال تعليق