शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

घरगुती जमिनीच्या वादातून भावाला बहिणीकडून जीवे मारण्याच्या धमक्या....


              रणजित दुपारगुडे             
         प्रतिनिधी 
         नाशिक : नांदगाव   घरगुती जमिनीच्या वादातून बहिण सौ. पंचशीला शशिकांत साबळे.यांच्याकडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व परत श्री. शशिकांत दत्तात्रय सोनावणे. व श्री. शांताराम दत्तात्रय सोनावणे परत त्याची जीवे मारण्याची धमकी येत असून सौ. पंचशीला शशिकांत साबळे व त्याचे जावई याचेवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येणे बाबत...
        श्री.शशिकांत दत्तात्रय सोनावणे. व शांताराम दत्तात्रय सोनावणे.रा. वाखारी ता. नांदगाव जि. नाशिक येथील रहिवाशी असून त्यांची बहिण सौ. पंचशीला शशिकांत साबळे. ह्या शिर्डी ता. राहाता जि. अहमदनगर येथील रहिवासी असून जमिनीचा वाद चालू असता सौ. पंचशीला शशिकांत साबळे. यांनी श्री. शशिकांत दत्तात्रय सोनावणे. यांना १३/१०/२०२३ रोजी नाशिक या ठिकाणी सौ. पंचशीला शशिकांत साबळे. व त्याचे जावई श्री.संतोष दिलीप साळवे. व श्री.संदीप दिलीप साळवे. यांनी डोक्यात धारदार हत्याराचा वापर करत मारहाण केली असून या विरोधात १३/१०/२०२३ रोजी गंगापूर पोलीस खात्यात तक्रार नोंदवली. असून 
          
         सौ. पंचशीला शशिकांत साबळे. व त्याचे जावई श्री.संतोष दिलीप साळवे. व श्री. संदीप दिलीप साळवे. यांनी पोलिसांवर राजकीय दबाव टाकत तक्रार दाबण्यात आली. असे त्यांनी सांगितले. गंगापूर पोलीस स्टेशन मधून काहीच निर्णय दिला नाही. प्रत्येकवेळी यांना डावलण्यात आले. आणि आता परत श्री.शांताराम दत्तात्रय सोनावणे. यांना परवा परत जीवे मारण्याची धमकी दिली असून ते बुधवार दि. २३/१०/२०२४ रोजी घरी येऊन मारू असेही धमकावले आहे. 
             हुकुमशाही सारखे वातावरणात राहावे लागत आहे ह्या कुटुंबियांना माघे मारण्याचा प्रयत्न केला आता परत तेच होणार असेल तर सामान्य जनतेने कोणाकडे दाद माघायची पोलीस स्टेशन त्यांच्या हातात आहे असे. ते वेळोवेळी दाखून देत आहे. ह्या कुटुंबाला न्याय नाही मिळाला, व सौ. पंचशीला शशिकांत साबळे. व त्याचे जावई श्री.संतोष दिलीप साळवे. व श्री.संदीप दिलीप साळवे. 
            याचेवर कायदेशीररीत्या कारवाही करण्यात न आल्यास मा. श्री आकाश भाऊ शांताराम डोळस जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ,महाराष्ट्र औद्योगिक जनरल कामगार सुरक्षा रक्षक युनियन संपर्कप्रमुख, महाराष्ट्र राज्य अखिल माथाडी आणि जनरल कामगार संघटना तालुका खेड जिल्हा पुणे अध्यक्ष तंटामुक्ती उपाध्यक्ष खरपुडी खु ।। यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव पोलीस स्टेशन समोर तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येईल. त्याचवेळी निवेदन देण्यात आले त्याचवेळी मा. श्री आकाश भाऊ शांताराम डोळस  जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ,महाराष्ट्र औद्योगिक जनरल कामगार सुरक्षा रक्षक युनियन  संपर्कप्रमुख ,महाराष्ट्र राज्य अखिल माथाडी आणि जनरल कामगार संघटना तालुका खेड जिल्हा पुणे अध्यक्ष  तंटामुक्ती उपाध्यक्ष खरपुडी खु ।।, सिद्धार्थ शेठ पवार ,शशिकांत शेठ सोनवणे उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم