शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

विजयादशमी चा मानकरी जेजुरीचा ऐतिहासिक महाखंड अद्यापही उपेक्षित मार्तंड देवस्थान विश्वस्तांचा मानमानी कारभार ... नथ सोन्याची आणि चेहरा पत्र्याचा !


जेजुरी प्रतिनिधी : संदिप रोमण.

              पुरंदर जेजुरी = संपुर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीक्षेत्र खंडोबा येथील *मर्दानी दसरा* जगप्रसिद्ध आहे . विजादशमी हा भारतभर साजरा होणारा लोकप्रिय सण असुन या सणात शस्त्र पुजनाला फार मोठे महत्व मानले जाते . जेजुरीच्या खंडोबा गडावरील जगप्रसिद्ध असलेला महाखंडा विजयादशमी *मर्दानी दसरा* म्हणुन जगप्रसिद्ध आहे. ही तीनशे वर्षांपूर्वीची इतिहास कालीन खंडा तलवार ही बेचाळीस किलो वजनाची असुन यास धार्मिक ऐतिहासिक महत्व प्राप्त असुन देखील केवेळ देवसंस्थान विश्वस्तांच्या मनमानी आणि अहंकारी भुमिकेमुळे सदर महाखंडा तलवार चक्क पत्र्याच्या पेटीत ठेऊन ईतिहासाच्या शस्त्र शास्त्र नितीचा अवमान केला असल्याची खंत माजी मार्तंड देवसंस्थान प्रमुख विश्वस्त संदिपआप्पा जगताप, मल्हारराजे प्रतिष्ठान , समस्त ग्रामस्थ खांदेकरी , मानकरी , गावकरी , रंभाई शिंपीन ट्रस्ट धालेवाडी आणि खंडा बहाद्दरांनी व्यक्त केली आहे . 
        मंदिराच्या लोक परंपरा संस्कृती या बद्दल सध्याच्या विश्वस्त कमिटीचे अज्ञान आणि राजकीय हितसंबधातुन जेजुरी खंडोबा देवसंस्थान गडावर निवडून आलेले विश्वस्त मनमानी कारभारातुन गडावर मागील विश्वस्तांनी या महा खंडा तलवार चे धार्मिक , ऐतिहासिक , सांस्कृतिक महत्व पाहता उपलब्ध करून ठेवलेल्या मेघडंबरीत ही तलावर न ठेवता पत्र्याच्या पेटीत ठेवून एक प्रकारे ऐतिहासिक भारतीय शस्त्राचा आवमान करीत असल्याचे उघड झाले आहे . 
वास्तविक पाहता तीर्थक्षेत्र जेजुरीचे हे ऐतिहासिक शस्त्र पाहण्या करिता मॉरीशेष , रशिया , फ्रांस ,जर्मनी , जपान आणि इंग्लंड व इतर देशातून खास ही खंडा तलवार पाहण्याकरिता विदेशी पर्यटक हजारोंच्या संख्येने येत असतात .
            
           परंतु भाषा न समजल्याने अथवा विश्वस्त यांच्या कडून याबतचे कोणत्याच भाषेत फलक नसल्याने त्यांना इतिहास ज्ञात होत नाही . याकरिता हिंदी , इंग्रजी , मराठी आणि इतर प्रादेशिक भाषेत या शस्त्राची माहिती फलक लावणे आवश्यक असल्याचे नागरिक पर्यटक भविकांचे मत आहे . 
          विशेषतः विजयादशमीला भारतीय शस्त्र आणि खंडोबा देवाच्या नवसाला आलेला खंडा तलवार महत्व असल्यामुळे या खंडा तलवार शस्त्राची विशेष पूजा करून चित्तथरारक कसरत करण्याची पारंपरिक प्रथा आजही सादर केली जाते . यात खंडा कसरती आणि खंडा तोलून धरण्याच्या स्पर्धांमधून विजेते पारितोशिक ही दिले जाते . या बाबत जर्मनी हेंडलबर्ग युनिव्हर्सिटीचे इतिहास अभ्यासक कै. डॉ गुंठुर सोनथायनर यांनी या तलवारीवर चाळीस वर्षापूर्वी लघुपट देखील प्रसारित केला होता . या सर्व बाबी पाहता अनेक वेळा विश्वस्त कमिटी जी सेल्फी आणि स्वजाहिरातीत मग्न असते ती या मागणीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करते असे चित्र स्पस्ट झाले आहे . 
             सध्या विश्वस्त व्हिआयपी आणि राजकीय व्यक्तींच्या खंडोबादेवाचे दर्शन व पुजा व्यवस्थेत मशगुल असुन मंदिराचा सांस्कृतिक विकास त्याचे सामाजिक व धार्मिक महत्व , भाविक पर्यटक यांच्या सोई सुविधा , मंदिराच्या ग्राम विकासाकडे , परंपरा याकडे दुर्लक्ष करून व्हीआयपी आणि अधिकाऱ्यांच्या मर्जी , सांभाळण्यात धन्यता मानत आहेत . 
          सदर खंडा तलवार *1763 ते 1766* च्या दरम्यान पुरंदरच्या ऐतिहासिक पानसे सरदार घराण्याने नवस पुर्ती म्हणून अर्पित केल्याचा इतिहास सांगितलं जातो . अशा धार्मिक व आध्य्यत्मिक , सांस्कृतिक दृष्ट्या ऐतिहासिक शस्त्राला पत्र्याच्या पेटीत ठेऊन मार्तंड देवसंस्थान विश्वस्त नेमके काय साधते हे समजू शकत नाही . सद्या तरी *नथ सोन्याची आणि चेहरा पत्र्याचा* अशी गत मार्तंड देवसंस्थांची झाली आहे या बाबात स्थानिक नागरिकांसह , प्रशासन , धर्मदाय आयुक्तांनी लक्ष न दिल्यास महत्वपुर्ण ऐतिहासिक अनमोल असा ठेवा पत्र्यातून ही नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे .

Post a Comment

أحدث أقدم