संकेत बागरेचा
धुळे जिल्हा प्रतिनिधी
दि. २२ पासून विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा शहरात पोलीस दलातर्फे पथसंचलन करण्यात आले. पोलीस निरीक्षक चाळासाहेब थोरात, पोनि गणेश कोळी, पोनि राजेंद्र सूर्यवंशी, सपोनि हनुमंत गायकवाड, सपोनि अविनाश केदार यांच्यासह आयटीबीपीचे अधिकारी राजेंद्र सिंह यांच्यासह ७ अधिकारी व ४७ जवानांची तुकडी सह स्थानिक पोलीस अंमलदार, कॉन्स्टेबल,पोलीस नाईक व गुप्तचर विभागाचे हेमंत फुलपगारे, आनंद पवार, चेतन माळी, होमगार्ड हेमंत पाटील, दिनेश गोसावी आदी सहभागी झाले होते.
निवडणुकीच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वासाचे आणि सुरक्षेचेवातावरण तसेच गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याचा धाक रहावा. कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी, निवडणूक निष्पक्षपणे पार पडावी यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे. दि २५ ऑक्टोबर शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गांधी चौकातील सराफा बाजारातून सदरचे पथसंचलनास सुरुवात झाली तेथून द मुखी मारुती मंदिर, देसाई गल्ली, साठघर मशीद, रथ गल्ली, तेरा घर मोहल्ला, श्रीराम मारुती मंदिर परिसर, माळीवाडा, जनता नगर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रवेशद्वार परिसर, जाधव नगर, भगवा चौक, बस स्टॅन्ड परिसरात सांगता झाली.
अचानक पणे पोलिसांचा तगडा ताफा व सायरन वाजणारी पोलीस गाडी बघून बघणाऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा एकच गर्दी केली होती.
إرسال تعليق