शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मतदानासाठी लऊळ येथे स्विप मल्टीमीडिया व्हॅनची जनजागृती



    लक्ष्मण शहापूरकर 
                     सोलापूर जिल्हा प्रतिनिधी 
           सोलापूर विधानसभा निवडणूकीमध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे याबाबत जनजागृतीसाठी केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या स्वीप मल्टीमीडिया व्हॅनचे माढा तालुक्यातील लऊळ येथे उत्साहात करण्यात आले.
           विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवणे आणि नव मतदारांना मतदान करण्याकरिता प्रेरित करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या स्वीप मल्टीमीडिया व्हॅनच्या माध्यमातून जिल्ह्यात जनजागृती सुरू आहे.सदर व्हॕनचे माढा तालुक्यातील लऊळ येथे उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले.यावेळी बी.एल.ओ.शैलेश घुगे , माडेकर , कारंडे , बाजीराव ढोरे , सोमनाथ भोंग ,प्रभारी केंद्रप्रमुख सूर्यकांत लोकरे, अंगणवाडी सेविका काजल कांबळे अंगणवाडी सेविका छाया लोंढे , श्रीमती मांदे मदतनीस उषा चव्हाण , श्रीमती डोरे , आशा वर्कर श्रीमती कोकाटे आशा सेविका मुजावर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व ग्रामपंचायतचे सदस्य व ग्रामस्थ हजर होते.

Post a Comment

أحدث أقدم