गुलाब शेख
उपसंपादक
महा विकास आघाडीचे अधिकृत ऊमेदवार हणमंतराव पाटील बेटमोगरेकरांचा प्रचाराचा धडाका पाहून विरोधक बिथरले आहेत.त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे अस्वस्थ झालेल्या विरोधकांनी नेहमीचीच बदनामीची मोहिम काढून कुजबुज गॅंगला कामाला लावली आहे.
बेटमोगरेकर हे काॅंग्रेसचे जिल्ह्यातील प्रभावी नेते म्हणुन पुढे येत आहेत.पक्षाने त्यांच्यावर जिल्हाध्यक्षाची मोठी जबाबदारी सोपवून त्यांच्यावरील विश्वासाचीच पावती दिलेली आहे.
भविष्यात महाराष्ट्रात मविआचेच सरकार येणार हा जनतेने दाखविलेला विश्वासच सांगतोय.त्यामुळे भविष्यात हणमंतरावांकडे मोठी जबाबदारी येवू शकते.लोकसभेला त्यांनी खासदार कै.वसंतराव चव्हाण समवेत जिल्हाभर काॅंग्रेसचा प्रचार प्रभावीपणे करुन यश मिळवून दिले.आताही आघाडीचे अधिकृत उमेदवार रविंद्र चव्हाण यांच्या बरोबर जिल्हाभर प्रचार करीत आहेत दोघांची बाॅंडीग सुरेख जमलीय.येणार्या काळात जिल्हा काॅंग्रेसमय होणार याचीच प्रचीती सध्याचे काॅंग्रेसचे उमेदवार प्रचारात आघाडी घेत आहेत यावरून सिद्ध होत आहे.जनता सध्याच्या गद्दार अन् घटनाबाह्य सरकारच्या विरोधात आहे.या महाराष्ट्र द्रोही सरकारला हद्दपार करणारच या हेतुने मतदार मतदान करणार आहेत.राज्यभर असेच वातावरण आहे.महायूतीतील वाढता बेनाब परस्परातील अविश्वास व एकमेकावर कुरघोडी करण्याची स्पर्धा यामुळे अंतर्गत अशांतता
मुळे ते परस्पराचेच उमेदवार पाडण्यासाठी लढत आहेत.
मुखेड मध्येही वेगळी परिस्थीती नाही.
अपक्ष असले तरी शिंदे सेनेचेच पुरस्कृत उमेदवार बालाजी खतगांवकर भाजपाच्या उमेदवाराला शह देत आहेत.अनेक मतदार संघात अशीच परिस्थीती आहे बहुसंख्य ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली एकमेकांचे पाय ओढण्याचा महाकार्यक्रम चालु आहे.
त्यामुळे महायूती एकसंघ राहिली नाही परिणामी बहूमता पासून दूर आहे.याउलट मविआ आक्रमक प्रचारातुन प्रभावी बाजु मांडत सत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
पायडल नसलेली मशिन फक्त दिखाव्यासाठी आहे. ती मशिन म्हणजे शिवण्याचे काम करु न शकणारी सिलाई मशिन आहे.जसे ते उमेदवारही पैशाच्या जोरावर गोड बोलून लोकांना भूलवत आहेत.ते जे दावे करत आहेत. ते पुर्ण करु शकणार नाहीत कारण अपक्षांना सत्ता मिळणार नाही एकट्याच्या बळावर सत्ता स्थापन कसे करतील ? मोठमोठ बोलून कांही होत नाही.लोक जागरूक आहेत.कांही लोक अपप्रचार करुन अपक्षांना सेक्यूलर मत मिळतील असे दावे करीत आहेत परतुं ते शिंदे सेनेचे पुरस्कृत आहेत हे लपून राहीले नाही म्हणुन भाजपाचीच छुपी चाल उघडी पडत आहे.त्यामुळे अशा भुलथापाला जनता भीक घालणार नाही.
मविआ मजबूतीने सत्ता स्थापन करेल.यांवर जनतेचा ठाम विश्वास आहे.
या सर्व परिस्थीतीचा विचार करून मविआचे अधिकृत ऊमेदवार *हणमंतराव पाटील बेटमोगरेकर*यांच्या पाठीशी आपण कंधार मुखेडची जनता उभी आहे.प्रचंड मताने ते विजयी होतील असा विश्वास जनतेमध्ये आहे. मतदाराचा मनात काय आहे हे येणार काळ च ठरेवल. परंतु मतदाराने पका निर्धार केलाय कोणाला मत देयाचे कोणाला पाडायचं....
महाराष्ट्र पोलीस न्यूज उपसंपादक गुलाब शेख
إرسال تعليق