संदिप रोमण
पुरंदर प्रतिनिधी( जेजुरी )
महाराष्ट्र राज्यातील निवडणुका संपुष्टात येऊन नव्या सत्तेचे नवे चेहरे मुख्यमंत्री पदी येताच पुरंदर मध्ये जेजुरी गडावर दौलतनाना शितोळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन महाराष्ट्र राज्याचे कुळदैवत असलेल्या खंडोबा गडावर कार्यकर्त्यांना घेऊन दाखल झाले आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणून अभिषेक पूजा हि केली.
परंतू सोबत आलेल्या काही टारगट कार्यकर्त्यांनी भेसळ युक्त भंडारा उधळत मंदिरात बालकणी वरून धुडगूस घातला, यामुळे देवदर्शनाला आलेले भाविक, अबाल वृद्ध, लहान लहान मुले तसेच नवीन लग्न झालेले नवरा नवरी, आणि मुली व महिला अश्याच लोकांना त्याचा त्रास झाला.
इतकेच काय तर मंदीर कर्मचाऱ्यांना ही न जुमंनता काही टारगट कार्यकर्त्यांनी भंडार फेकून मारण्याचे प्रकार ही जाणीव पूर्वक केले.
देवाला आलेल्या नववधू आणि सहलीस आलेल्या मुलींच्या अंगावर भंडार फेकून मारल्याने डोळ्यात भंडार जाऊन जळजळ निर्माण झाली यात लहान मुलांनाही त्रास झाला हा सर्व प्रकार श्री मार्तंड देव संस्थान कमिटी सदस्यांच्या देखत घडला परंतू देव संस्थान विश्वस्त मंडळ ही या बाबत मौन धरून होती.
वास्तविक पहाता गडाच्या सज्जावर भाविकांना जाण्यास ट्रस्टने मनाई केलेली असता देखील शेकडो किलो भंडार घेउन कार्यकर्ते वर कसे जातात हा प्रश्न पडतो इतकेच काय गडावर जाण्याच्या गाडी मार्गावर अपंग वृद्ध आणि सत्तर वर्षा पुढील भाविकांना जाण्यास अनुमती असते परंतू पक्षीय नेत्याच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या काही विश्र्वस्तांच्या अनुमतीने सोडण्यात आल्या असल्याचे ही समजते.
सदर विश्वस्त मंडळ ही राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने विश्र्वस्तांचां मनमानी कारभार मंदिरावर चालत असल्याचे चित्र सोमवारी दिसुन आले या मनमानी कारभारामुळे जेजुरीचा खंडोबा गड राजकीय अड्डा झाला आहे का असा सवाल नागरिक करू लागले आहेत. ट्रस्ट ने मंदिरावर आणला जाणारा भंडार हा भेसळ युक्त आहे का नाही? याची तपासण्याची तसदी देखील घेतली जात नाही. *कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी दररोज पोलीस बंदोबस्त असतानाही असे प्रकार घडत असतील तर हे कृत्य अतिशय लाजिरवाने आहे असे म्हणणे काही गैर ठरणार नाही
देवदर्शनासाठी अलेल्या भाविकांना मात्र त्याचा त्रास सहन करावा लागला आहे जेजुरी मंदीर विश्वस्त कृपेने राजकीय पक्षांचे धुडगुस घालण्याचे केन्द्र होऊ लागल्याने मंदिराचे धार्मिक महत्व कमी होऊ लागले आहे एवढे माञ खरे आहे अशी ग्रामस्थ व भाविक यांच्यात चर्चा असल्याचे बोलले जाते.
إرسال تعليق