आज रोजी नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी, नागपुर येथे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचा अहवाल सादर केला. प्रभारी रमेश चेन्नीथला हे प्रत्येक उमेदवार, अध्यक्ष यांच्याशी व्यक्तिगतरित्या भेट घेऊन अहवाल जाणून घेत होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, सहप्रभारी कुणाल चौधरी, मा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नसीम खान, आमदार विश्वजीत कदम, अमित देशमुख, नागपुर जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष बाबाजी आष्टणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सोलापूरहून तिरूपती परकीपंडला सोबत होते.
१७ डिसेंबर २०२४
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
إرسال تعليق