शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

बेकायदेशीरपणे गायरान जमिन अतिक्रमण करणाऱ्यावर कार्यवाहीची मागणी

*वनविभागाचा उदासीनतेमुळे धनदांडगे व शासकीय कर्मचाऱ्यांचे वनजमिनिवर अतिक्रमण...*
*बेकायदेशीरपणे गायरान जमिन अतिक्रमण करणाऱ्यावर कार्यवाहीची मागणी*
            मुखेड:- वनविभाग खात्यातील प्रशासकीय अधिकारी यांच्या उदासीनतेमुळे गायरान जमिनीवरील धन दांडग्यांची आणि शासकीय कर्मचऱ्यांची अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. प्रस्थापित धनदांडग्यांकडून सरकारी जमिनीची लूट होताना आपण पहातच आहोत. मात्र याचा जबर फटका गोरगरीब गायरान जमीन भोगवटदारांना बसत आहे.
मौजे सुगाव( बु.) ता. मुखेड येथील गावालगत वनविभागाची जवळपास 134 हेक्टर जमीन असून सण 1992 ला भूमीहीन गोर गरीब लोकांना त्यांच्या उदरनिर्वाची सोय व्हावी, या उद्देशाने शासनाने दान स्वरूपात पट्टे वाटप केले होते. 
मात्र याचा गैर वापर धनदांडगे व शासकीय सेवेतील कर्मचारी करत असल्याचे उघडकीस आले आहे. असाच एक शासकीय सेवेत पोलीस पाटील या पदावर कार्यरत असलेल्या शिवकुमार शरणपा गंदीगुडे हे वनजमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून गोरगरिबाच्या पोटावर पाय देऊन शासकीय जमीन बळकावली आहे.
त्यामुळे बेकायदेशीरपणे अतिक्रमण करणाऱ्या पदाधिकार्याची चौकशी करून अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी गोरं गरीब गायरान जमीन धारकांकडून होत आहे.
अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुखेड तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनास दिला आहे.

महाराष्ट्र पोलीस न्यूज 24
उपसपादक गुलाब शेख

Post a Comment

أحدث أقدم