शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली

*स्व. मनमोहन सिंग हे आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात अनेक योजना राबवून जनसामान्यांचे जीवन बदलणारे, महत्वाचे सुधारणा करून देशाला मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर काढणारे महान अर्थतज्ञ होते :- चेतन नरोटे*

*सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली*

दि. २८ डिसेंबर २०२४
प्रतिनिधी मोसीन आतार 
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केले होते शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे व मान्यवर नेतेमंडळी यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी शोकसभा होऊन पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी शोक व्यक्त करताना चेतन नरोटे म्हणाले की, आपली बुद्धिमत्ता, आपला ज्ञान, आपला शिक्षण, आपला अभ्यास व आपला अनुभव पणाला लावून देशाचं आर्थिक विकास खऱ्या अर्थाने घडविणाऱ्या शांत, संयमी, अभ्यासू आणि दूरदृष्टी बाळगणारे भारताचे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग हे आपल्यात राहिले नाहीत. स्व. मनमोहन सिंग यांनी आपल्या दहा वर्षे पंतप्रधानाच्या कार्यकाळात अन्नसुरक्षा कायदा, मनरेगा योजना, भूमी अधिग्रहण कायदा, माहिती अधिकार कायदा, शिक्षण हक्क कायदा, वनाधिकार कायदा, आधार कार्ड, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर, या जनसामान्यांचं आणि गरिबांचं आयुष्य बदलणाऱ्या महत्वाच्या सुधारणा त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केल्या. त्याचा लाभ आजची पिढी घेत आहे. त्याच प्रमाणे इंडो युस न्युक्लिअर डिल, गॅट करार (खुले आर्थिक धोरण), परराष्ट्र व्यापार विकास धोरण, उद्योग धोरण राबवून आमूलाग्र बदल घडवून देशाला मजबूत अर्थव्यवस्था दिली. १७ टक्के वर गेलेली महागाई, वित्तिय चलनात फार मोठ्ठी तुट, आर्थिक दिवाळखोरी अशी अनेक आव्हाने समोर असताना मंदीच्या काळात देशाला सावरलं आणि मजबूत केले प्रगतीच्या वाटेवर नेले. जगात देशाची मान उंचावली. 
👉 त्याचप्रमाणे आपले नेते सुशीलकुमार शिंदे साहेब पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत दहा वर्षे ऊर्जा मंत्री, गृहमंत्री म्हणून काम करत असताना सुशीलकुमार शिंदे यांच्या मागणीनुसार सोलापुरात NTPC, पॉवरग्रीड, बोरामनी विमानतळ भूमिपूजन, अनेक नॅशनल हायवे, BSF ट्रेनिंग सेंटर, दहा हजार घरकुलांचे गोदूताई विडी घरकुल योजना असे अनेक प्रकल्पास सहकार्य केले. त्यामुळे मनमोहन सिंग यांचे योगदान देश विसरु शकणार नाही.

या श्रद्धांजली कार्यक्रमास शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, प्रदेश सरचिटणीस सुशीलाताई आबुटे, शकील मौलवी, माजी महापौर आरिफ शेख, मा. नगरसेवक शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, भारतीताई इप्पलपल्ली, परवीन इनामदार, ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड, अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी, उपाध्यक्ष बसवराज म्हेत्रे, अंबादास गुत्तिकोंडा, विश्वनाथ साबळे, सिध्दाराम चाकोते, हणमंतु सायबोळू, राजन कामत, VJNT अध्यक्ष युवराज जाधव, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मधुकर आठवले, वाहिद बिजापुरे, तिरूपती परकीपंडला, अनिल मस्के, संजय गायकवाड, गिरीधर थोरात, सुबोध सुतकर, लखन गायकवाड, अशोक कलशेट्टी, रुस्तम कंपली, हाजी मंगल नदाफ, हारून शेख, दिनेश म्हेत्रे, रमेश फुले, मैनुद्दीन शेख, विवेक कन्ना, रजाक कादरी, एजाज बागवान, अँड, करिमुनिसा बागवान, सुमन जाधव, हेमाताई चिंचोळकर, विणाताई देवकते, शुभांगी लिंगराज, मुमताज तांबोळी, चंदा काळे, वर्षा अतनुरे, रेखा बिनेकर, मुमताज शेख, नीता बनसोडे, विजयलक्ष्मी झाकणे, सुनीता व्हटकर, संगिता शिंगारे, मीना गायकवाड, अनिता भालेराव, सुभाष वाघमारे, सुनील सारंगी, मोहसिन फुलारी, श्रीकांत दासरी, चंद्रकांत टिक्के, महेंद्र शिंदे, जहाँगिर सय्यद, अभिलाष अच्युगटला, समीर पठाण, गोफल मामड्याल, धैर्यशील बाबरे, गुलाब करणकोट, चंदु नाईक, गंगाधर शिंदे, भिमराव शिंदे, डॉ किरण खरात, आदी उपस्थित होते..🙏🙏💐💐

Post a Comment

أحدث أقدم