शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगावच्या विद्यमानेभव्य ओव्हर फार्म क्रिकेट सामन्यांचे आयोजन

*बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगावच्या विद्यमानेभव्य ओव्हर फार्म क्रिकेट सामन्यांचे आयोजन*
 ( माणगाव - रा .जी . संपादक - उत्तम तांबे )
बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगाव या मातृसंस्थेच्या विद्यमाने शनिवार दिनांक - 18 / 1 / 2025 ते रविवार दिनांक - 19 / 1 /2025 या दोन दिवशीय भव्य ओव्हर फार्म क्रिकेट सामन्यांचे आयोजन अल्ताफ दादा धनसे मैदान , मोरबा रोड ,माणगाव येथे करण्यात आले आहे . भिमरत्न चषक 2025 - प्रथम क्रमांक - 50000/- व आकर्षक चषक , द्वितीय क्रमांक - 30000 / - व आकर्षक चषक , तृतीय क्रमांक - 15000 / - व आकर्षक चषक तर चतुर्थ क्रमांक - 10000/- व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट गोलंदाज , फलंदाज , सामनावीर , मालिकावीर असे आकर्षक चषक , टॉवर फॅन व लकी ड्रॉ म्हणून विशेष आकर्षण सोन्याची अंगठी बहाल करण्यात येणार आहे . सदर सामने युट्युब वर लाईव्ह असणार आहेत . भीमरत्न चषक 2025 या नियोजित भव्य ओव्हर आर्म क्रिकेट सामन्यांमध्ये माणगाव तालुक्यातील बौद्धजन पंचायत समितीतील 11 उपशाखांमधील इच्छुक संघाने 7 जानेवारी 2025 पर्यंत आपल्या संघाची नोंदणी करावी . बौद्धजन पंचायत समिती तालुकाध्यक्ष - रवींद्र मोरे मो .नं. 7775092048 , तालुका सरचिटणीस - आर .डी . साळवी मो नं . - 9637212238 , विवेक जाधव - 8806113401 .यांच्याकडे इच्छुक संघाने नोंदणी करता संपर्क साधावा ; असे आवाहन बौद्धजन पंचायत समिती तालुकाध्यक्ष - रवींद्र मोरे यांनी केले आहे .

Post a Comment

أحدث أقدم