🤼♂️🤼♂️ *कुस्तीच्या मैदानात प्रणिती शिंदे*
खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा येथे आयोजित भव्य कुस्ती स्पर्धेस उपस्थित राहून पैलवानांना प्रोत्साहन दिले.
प्रतिनिधी मोसीन आतार
दिनांक, २५ जानेवारी २०२५
मंगळवेढा येथील जय मल्हार कला क्रीडा व सेवा मंडळ आयोजित "मंगळवेढा केसरी कुस्ती स्पर्धा २०२५" मारुती पटांगण मंगळवेढा येथे आज पार पडल्या या कुस्त्याचे आयोजन पैलवान मारुती बापू वाकडे व सचिन फडतरे यांनी केले होते. या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्याच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थिती राहून पैलवानांना प्रोत्साहन दिले.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की, कुस्ती सारख्या क्रीडाप्रकारातुन शिस्त, समर्पण आणि संघर्षाची भावना खऱ्या अर्थाने वाढीस लागते. भविष्यात महाराष्ट्राची कुस्ती परंपरा जिवंत ठेवायची असेल तर खुल्या कुस्ती स्पर्धा, यात्रा जत्रातले फड, महाराष्ट्र केसरी, या स्पर्धांचे आयोजन सातत्याने होणे गरजेचे आहे आणि कुस्तीपटूंना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. तसेच यावेळी सर्व खेळाडूंसाठी उज्वल भविष्याच्या आणि विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच कुस्ती स्पर्धा आयोजित केल्याबद्दल पैलवान मारुती बापू वाकडे व सचिन फडतरे यांचे अभिनंदन केले.
या कुस्ती स्पर्धेला सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष एडवोकेट नंदकुमार पवार, मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे, शिवसेना शहराध्यक्ष दत्ता भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, काँग्रेसचे नेते एडवोकेट राहुल घुले, इंग्लिश स्कूल मंगळवेढा च्या तेजस्विनी कदम मॅडम, दया वाकडे मॅडम आधी उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
إرسال تعليق