नेर येथील नादुरस्त कृषी ट्रांसफार्मर त्वरित बसवा. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. शंकरराव खलाणे यांची कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी.
महाराष्ट्र पोलीस 24 न्यूज
धुळे जिल्हा प्रतिनिधी संकेत बागरेचा नेर
नेर येथील नूरनगर शिवारातील डीटीसी. नंबर ४२१३८०२ हा १०० के. व्ही. क्षमतेचा व महाकाळी शिवारातील घोगरा परीसरातील १०० के.व्ही.क्षमतेचा ट्रांसफार्मर नादुरुस्त झाला असून सध्या कांद्याची व मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू असून शेतकऱ्यांना रात्री, पहाटे पाणी देण्यासाठी जावे लागते. दोघी ट्रान्सफॉर्मर वारंवार नादुरुस्त होत असल्याने ते त्वरित बसवण्यात यावे यासाठी शेतकऱ्यांनी नेरचे माजी सरपंच व भाजपा जिल्हाउपाध्यक्ष श्री शंकरराव खलाणे यांची भेट घेऊन व्यथा मांडली. त्यांनी त्वरित नेर विद्युत उपकेंद्रकाचे अभियंता अविनाश आहेर यांच्याशी संपर्क करून त्वरित नादुरुस्त रिपोर्ट घेऊन सब. डिव्हिजनचे कार्यकारी अभियंता श्री डी. डी.भांमरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन रब्बी हंगामाचे दिवस असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय दूर व्हावी म्हणून ट्रांसफार्मर त्वरित उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली यावेळी सामाजिक कार्यकर्ते वसंत बोरसे हेही उपस्थित होते.यावर श्री भामरे यांनी प्रतीक्षा यादी मोठी असूनही दोन दिवसात ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देणार अशी आश्वासन दिले.
إرسال تعليق