*मुखेड शहरातील रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तात्पुरत्या स्वरुपात राजेंच्या पुतळ्यात पाणी साचू नये व पाणी साचल्यास त्यांच्या दोन्ही पायांतुन पाणी खाली पडावे यासाठी प्रशासनाने व राजकीय नेत्यांनी सावरासावर करून राजकीय स्वार्थापोटी श्रेय घेणाऱ्या राजकीय नेत्याकडून राजेंच्या पायाखाली गोल रिपीट बसविले व अश्वारुढ राजेंचा पुतळा नागरीकांसाठी खुला करण्यात आला त्याबद्दल त्यांचे शहर काँग्रेस,शिवसेना ( ऊ.बा.ठा. ) च्या वतीने सर्व जनतेकडून आभार.* नागरिकांनी अश्वारूढ पुतळा पाहताना राजेंच्या पायाखालील भागांची पाहणी करावी व विचार करण्यास स्वतःला भाग पडेल,मनात असंख्य प्रश्न निर्माण होतील व येणाऱ्या पावसाच्या दिवसातच राजेंच्या पुतळ्याचे काय हाल होतील याकडे सर्वांचेच लक्ष हे कायम असेल.प्रशासनाने गांभिर्य दाखवुन सदरचा पुतळाच बदलावा अशी नागरीकांची मागणी ही हट्टेखोरापुढे दुटप्पी भावनेची आहे.हे लिहीणे म्हणजे राजकीय स्टंट नव्हेच. राजेच्या येणाऱ्या जयंती निमित्ताने शिवजयंती महोत्सवा निमित्त तात्पुरता का होईना राजेंचा पुतळा नागरीकासाठी खुला केल्यानंतर राजेंना पुष्पहार घालुन शहर काँग्रेसच्या वतीने व जयंती मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव डॉ.श्रावण रॅपणवाड,महाराष्ट्र सेवादल काँग्रेस सचिव अण्णासाहेब जाहीरे,काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर,शिवसेना उबाठा गटाचे अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख जैनोद्दीन पटेल, युवक काँग्रेस शहराध्यक्ष जयप्रकाश कानगुले,सहकार सेल शहराध्यक्ष रामेश्वर पाटील इंगोले,जिल्हा युवक काँग्रेस सचिव सुनिल पाटील आरगीळे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहराध्यक्ष ईमराण पठाण,मागासवर्गीय काँग्रेस सेल शहराध्यक्ष बालाजी साबणे,शिवजयंती २०२५ चे अध्यक्ष नरेश पाटील इंगोले, काँग्रेस शहर उपाध्यक्ष बालाजी वाडेकर,काँग्रेस शहर उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड,युवक काँग्रेसचे मा.उपाध्यक्ष माधव पाटील तुपदाळकर,आंदोलनकर्ते श्याम पाटील इंगोले,बालाजी पाटील इंगोले,योगेश पाटील खंडगावकर,अविनाश पाटील,चिमणाजी बाबळे,अनिल राठोड सह मित्र परिवार उपस्थित होता.
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24
उपसपादक महाराष्ट्र राज्य
गुलाब शेख
إرسال تعليق