परंडा येथील सदगुरु शिवाचार्य यज्ञेश्वर (वेडे) महाराज यांची 225 वी पुण्यतिथि मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली..
प्रतिनिधी हारून शेख
त्या निमित्त भोत्रा रोडवरिल वेडे महाराज मठात तीन दिवस अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 12 वाजता सदगुरु शिवाचार्य यज्ञेश्वर वेडे महाराज यांच्या समाधीस्थळी विधीवत अभिषेक पुजा पुष्पवृष्टी करुन महाआरती करण्यात आली.व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या वेळी राचलिंग शिवाचार्य परंडकर महाराज, मुक्तेश्वर शिवाचार्य वेळापुरकर महाराज , डाॅ निळकंठ शिवाचार्य धारेश्वरकर महाराज, प्रभुदेव शिवाचार्य माढेकर महाराज, विरूपाक्ष शिवाचार्य मानुरकर महाराज, माजी नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर, माजी जि.प.अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, खदीरभाई जिनेरी आदी उपस्थित होते.दरम्यान परंडकर महाराज मठापासून ते वेडे महाराज मठापर्यंत टाळ मृदंगाच्या गजरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.यावेळी मोठा भक्ती समुदाय उपस्थित होता.हा भव्य दिव्य सोहळा साजरा करण्यासाठी परंडकर ब्रहन्मठ संस्थानच्या शिष्य व शिव भक्तांनी परिश्रम घेतले...
إرسال تعليق