शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

श्री बसवेश्वर मराठी विद्यालय विडी घरकुल सोलापूर येथे आज शनिवार दि 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

संभाजीराव शिंदे विद्यामंदिर संचलित श्री बसवेश्वर मराठी विद्यालय विडी घरकुल सोलापूर येथे आज शनिवार दि 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून आपल्या शाळेत माता पालिकांची बेसनपीठाचा उपयोग करुन विविध खाद्य पदार्थ बनवणे. ही स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेसाठी  105 माता पालिकांनी उपस्थिती नोंदविली. आपल्या संस्था संचालिका डॅा. सौ.राधिकाताई चिलका मॅडम यांच्या हस्ते आपले शिक्षण महर्षी स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे आणि विद्येची देवता सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या स्पर्धेचे परिक्षक विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. शैलजा ससाणे मॅडम यांनी स्पर्धेमधील सहभागी माता पालिकांनी स्पर्धेमध्ये सादर केलेल्या पदार्थांचे परिक्षण केले.सर्व मातापालिकांचे कौतुक करुन यशस्वी स्पर्धकांचे नंबर ही काढले. तसेच सर्व माता पालिकांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.डॉ.सौ राधिका चिलका मॅडम यांनी स्पर्धेत सहभागी व यशस्वी माता पालिकांचे कौतुक केले. आणि जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. मार्गदर्शिका श्रीमती मारपल्ली मॅडम यांनी सर्व स्पर्धेत यशस्वी व उपस्थित माता पालिकांना जागतिक    महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या .व या पुढेही शाळेच्या उपक्रमामध्ये असाच सहभाग घ्यावा असे अवाहन केले.हा कार्यक्रम सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री पवार एस. के.सर यांनी केले.व मनोगत व्यक्त करुन उपस्थित सर्व महिलांना श्री मोरेसर, श्री शिंदे सर यांनी शुभेच्छा  दिल्या.यशस्वी माता पालिकांचे प्रथम, द्वितीय, तृतिय तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांक आलेल्या महिलांचे डॉक्टर सौ .राधिकाताई चिलका मॅडम यांच्या हस्ते  बक्षिस देऊन  अभिनंदन करण्यात आले.श्री पारवे सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

أحدث أقدم