माणगाव चांदोरे गावाजवळ बर्निंग कारचा थरार
( माणगाव - उत्तम तांबे , रा .जी . - संपादक )
दिघी ते पुणे (मुळशी ) या मार्गी प्रवास करणाऱ्या पर्यटकांच्या जॅगवार कारने माणगाव तालुक्यातील चांदोरे गावचे हद्दीत येताच , चालत्या कारने अचानक भर दुपारी पेट घेतल्याने पर्यटक कारचालकाने वेळीच दक्षता घेतल्याने रस्त्याच्या बाजूला गाडी थांबून प्रवास करणारे पाचही प्रवासी तात्काळ गाडीतून उतरल्यामुळे सुदैवाने जीवित हानी टळली .मात्र कारने पेड घेतल्याने कारचा जळून कोळसा झाला .कारमधून प्रवास करणारे प्रवासी - सुनील पवार राहणार - ताथोडे ' मुळशी पुणे व त्यांची पत्नी व तीन मुलांसहित आपले कार क्रमांक - एम . एच . 14 ई एम - २४०० जॅगवार कारने पुणे ते दिघी असा प्रवास करीत असताना माणगाव तालुक्यातील चांदोरे गावाजवळील अन्नपूर्णा हॉटेल समोरून जात असताना , प्रवास करत असताना त्या कारने अचानक पेट घेतला . ही घटना सुनील पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सदर कार रस्त्याच्या बाजूला उभी करून तप्तरतेने या पेटत्या कारमधुन पाचही प्रवाशांना बाहेर उतरवले . या तत्पर दक्षतेमुळे सुदैवाने त्यात कोणतेही जीवित हानी झाली नाही .मात्र कारमध्ये असलेले लॅपटॉप , मोबाईल फोन व इतर विविध वस्तूंचे जळून नुकसान झाले . या घटनेबाबत तेथील गावातील नागरिकांना माहिती समजताच नागरिकांनी पाण्याचा टँकर उपलब्ध करून सदर पेटतीकार शेवटी विझवण्यात आली .
إرسال تعليق