मा.ना. क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री श्री दत्तात्रय (मामा) भरणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी भेट घेऊन विविध विषयासंदर्भात निवेदन दिले.
प्रतिनिधी,मोसीन आतार
भरणेवाडी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा ) चंदनशिवे यांनी भरणेवाडी येथे महाराष्ट्र राज्याचे मा.मंत्री दत्तात्रय (मामा)भरणे यांची भेट घेऊन नागरिकांच्या विविध विषयासंदर्भात चर्चा करून निवेदन दिले.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निर्णयानुसार सोलापूर महानगरपालिकेतील सन 1995 नंतर सेवेत कार्यरत असलेल्या 249 रोजंदारी व बदली कामगारांना सेवेत कायम करण्यासंदर्भात नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. तसेच सोलापूर शहरातील विविध विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली.
वरील विषयाच्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मा.ना. क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री श्री दत्तात्रय (मामा) भरणे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. सदरचे विषय तातडीने सोडवण्यासंदर्भात संबंधितास आदेश व्हावेत असे नम्र विनंती करत मंत्री महोदयास निवेदन दिले.
यावेळी सो.म.पा. मा.नगरसेवक गणेश पुजारी, अविनाश भडकुंबे,भीमा मस्के इत्यादी उपस्थित होते.
إرسال تعليق