शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

जुबेर भाई कुरेशी यांच्या वतीने रमजान निमित्त रोजा ईफ्तार आणि खाने की दावत कार्यक्रम संपन्न

जुबेर भाई कुरेशी यांच्या वतीने रमजान निमित्त रोजा ईफ्तार आणि खाने की दावत कार्यक्रम संपन्न
सोलापूर शहर काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष जुबेर भाई कुरेशी (Z boss), खलील कुरेशी यांच्या वतीने रमजान निमित्त रोजा ईफ्तार आणि खाने की दावत कार्यक्रम बेगम पेठ संगम बेकरी जवळ मुहम्मदिया मस्जिद समोर सोलापूर येथे आयोजित केला होता.
या कार्यक्रमात हजारो समाजबांधव, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, सहभागी झाले होते याप्रसंगी चेतन भाऊ नरोटे, प्रकाश यलगुलवार, सुरेश हसापुरे, आयोजक जुबेर कुरेशी यांनी सर्वांना रमझान ईद च्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी हिंदू- मुस्लिम समाजाचा भाईचारा पाहाण्यास मिळाला. तसेच हा सलोखा भाईचारा बंधुभाव कायम अविरत असेच राहवे म्हणून दुवा (प्रार्थना) करण्यात आली.

या रोजा ईफ्तार आणि खाने की दावत कार्यक्रमास सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, मा. रियाज भाई हुंडेकरी, यंग ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष सुदीप चाकोते, प्रदेश चिटणीस शकील मौलवी, अखलाक कुरेशी, मंजूर मामा बागवान, मुबिन सय्यद, वसीम कामले, भैय्या दफेदार, मुबिन कुरेशी, वाहिद कुरेशी, अब्बास कुरेशी, इलियास शेख सर, वाजिद सालार, मुकरी सालार, सैफन शेख, शोएब महागामी, सबिना इंगळगी, प्रमिला तूपलवंडे, मतीन बागवान, राजन कामत, बशीद इंगळगी, आसिफ तीम्मापुरे, भीमाशंकर टेकाळे, समीर शेख, सलीम पामा, सादिक कुरेशी, तिरुपती परकीपंडला, रुपेश गायकवाड, नूर अहमद नालवार, नासिर बंगाली, रजाक कादरी, रुस्तुम कंपली, इब्राहिम शेख, शकील शेख बिल्डर, अझर गोल्डन, मुजाहिद जमादार, जुनेद वळसंगकर, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, अप्पू शेख, अमीर शेख, श्रीशैल रणखांबे, अजमल शेख, मूर्तुज काझी, यांच्यासह हजारों समाजबांधव, उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم