शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पेण पोलीस ठाणे हद्दीत छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी, साजरी

पेण पोलीस ठाणे हद्दीत छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी, साजरी 
आज रोजी पेण पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 29/03/2025 रोजी 10.35 ते 11.05 पर्यंत साजरी होणारी छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी, गुढीपाडवा, रमजान ईद, राम नवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, व इतर साजरे होणारे सणाच्या अनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक सो. रायगड अलिबाग यांच्या आदेशाने व मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सर पेण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पेण, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, खान मोहल्ला जामा मस्जिद, महावीर मार्ग, खाटीक मोहल्ला मज्जिद, पेण बाजारपेठ, पेण एसटी स्टँड, नगरपालिका नाका, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, रूट मार्च घेण्यात आला. 
        तसेच मा.SDPO कार्यालय पेण प्रांगणात, आज दि.29/03/2025 रोजी 10.00 वा. ते 10.30 वा. दरम्यान दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली. 
          सदर रूट मार्च दंगा काबू रंगीत तालीम करिता पेण पोलीस ठाण्याकडील 6 अधिकारी, 22पोलीस अंमलदार, 4 होमगार्ड, पोयनाड पोलीस ठाण्याकडील 1 पोलीस अधिकारी व 5 पोलीस अंमलदार, तसेच वडखळ RCP प्लॅटून 30 जवान उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم