नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला.
उपसंपादक गुलाब शेख
यावेळी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, नांदेडचे माजी खासदार श्री. भास्करराव पाटील खतगावकर, नांदेड महानगरपालिका माजी महापौर आणि माजी आमदार श्री. ओमप्रकाशजी पोकर्णा, नांदेड जिल्हा परिषद आणि जिल्हानियोजन समिती माजी सदस्या डॉ. सौ.मिनलताई खतगावकर, नांदेड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर श्री सरजितसिंग गिल यांच्यासह अनेक मान्यवरांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. मी सर्वांचं पक्षात मनापासून स्वागत करतो. यामुळे नांदेडमध्ये पक्ष वाढीस नक्कीच बळ मिळणार आहे.
याप्रसंगी संवाद साधताना, महायुतीनं महाराष्ट्राच्या विकासाचं रथ गतिमान केलं आहे. त्याचे सारथी बनून आपण सर्वांनी राज्याच्या प्रगतीत आपला हातभार लावायचा आहे. तसंच जनकल्याणाच्या कार्यात मोलाची भूमिका पार पाडायची आहे, अशा भावना व्यक्त केल्या.
मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यांतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज घेतली. यावेळी जिल्हा पातळीवरील विकास कामं करण्यात, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडवण्यात राष्ट्रवादीचे शिलेदार म्हणून आपण सगळेजण कुठेही कमी पडता कामा नये, अशा सूचना केल्या. सर्वांनी समन्वयनं, एकजुटीनं तसंच एकमेकांच्या सहकार्यानं कामं मार्गी लावायची आहेत, हे देखील सूचित केलं. जनकल्याणाच्या कार्यात सगळ्यांनी आपला वाटा उचलायचा आहे, जनसेवेसाठी सदैव तत्पर रहा, असं आवाहन केलं.
إرسال تعليق