बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात लाखोच्या संख्येने सहभागी व्हा . - लक्ष्मण भगत माणगाव - उत्तम तांबे , रा .जी . संपादक
बौद्धजन पंचायत समितीचे मुंबई सभापती , सरसेनानी - आनंदराज आंबेडकर यांनी 20 मार्च 2025 रोजी महाड क्रांती भूमी येथे शनिवार दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी सम्राट अशोक जयंतीदिनी मुंबई - राणीबाग भायखळा ते आझाद मैदान असा भव्यमोर्चा संदर्भात सूचित केले होते .त्याला अनुसरून बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महामोर्चात समस्त बौद्धजन पंचायत समितीच्या सर्व पदाधिकारी व विश्वस्त मध्यवर्ती महिला मंडळ सभासद बौद्धचार्य व धम्म बांधवांनी लाखोच्या संख्येने सहभागी व्हा . असे बौद्धजन पंचायत मुंबई समितीचे कार्याध्यक्ष - लक्ष्मण भगत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे .
तथागत भगवान गौतम बुद्धांचे ज्ञानप्राप्ती स्थळ - बोधगया महाबोधी महाविहार हे विश्वातील समस्त बौद्धधम्मीयांचे पवित्र स्थळ आहे .या महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी , बोधगया बिहार अधिनियम (बी . टी . एम . सी . अॅक्ट 1949 ) रद्द करण्यासाठी ऑल इंडिया बौद्ध फोरम दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ' समता सैनिक दल ' अखिल भारतीयभिकू संघ आणि समाजाच्या अनेक धार्मिक आणि सामाजिक संघटना दिनांक 17 / 9 /2024 पासून बोधगया येथे आंदोलन करीत आहेत तसेच 12 /2 / 2025 रोजी पासून अनिश्चित कालीन उपोषण धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने , संविधानिक मार्गाने केंद्र सरकार आणि बिहार सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करीत आहेत .परंतु विश्वस्त समितीवर ब्राह्मण समाजाचे वर्चस्व असल्यामुळे हे निगरगट्ट सरकार बौद्धांच्या या मागणीस हरताल फासण्याचा प्रयत्न करीत आहेत .बौद्धजन पंचायत समिती या आपल्या मातृसंस्थेचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात असूनही ही संस्था समाजमान्यता असलेली संस्था आहे .आणि त्यामुळे समस्त विश्वातील बौद्धांच्या अस्मितेचे असलेले पवित्र स्थळ महाबोधी महाविहार या मुक्ती आंदोलनास आपल्या बौद्धजन पंचायत समितीने जाहीर पाठिंबा देऊन झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागृत करण्यासाठी या भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे .आपली मातृसंस्था बौद्धजन पंचायत समिती या संस्थेचे मुंबई सभापती - आनंदराज आंबेडकर यांनी अद्याप पर्यंत जेवढे आंदोलने केली आहेत ती सर्व यशस्वी करून दाखविली आहेत . त्यांच्या आदेशाप्रमाणे तसेच कार्याध्यक्ष - लक्ष्मण भगत यांच्या अहवाना नुसार बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगाव या शाखेचे विद्यमान अध्यक्ष - रवींद्र भिकू मोरे यांनी आपल्या 11 शाखेतील पदाधिकाऱ्यांना सदर आंदोलनाबाबत सूचित करून महत्वकांशी भूमिका घेऊन सदर बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात बहुसंख्येने सामील होण्याकरता आवाहन केले आहे .
إرسال تعليق