मा. तहसीलदार पेण यांच्या दालनासमोर लक्षवेधी सत्याग्रह ठिया आंदोलन
रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड
कणे कोप्रोली खारभूमी योजनेच्या नूतनीकरणाचे कामा दरम्यान उघाडीतून आलेल्या भरतीच्या खार्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळणेबाबत तथा संबंधित विभागास तात्पुरती उपाययोजना करण्याच्या तथा उघाडिचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक ८/४/२०२५ रोजी ११वाजल्यापासून तहसिलदार पेण यांचे दालनासमोर ग्रामपंचायत कणे ग्रामस्थ मंडळ कणे पेण खारेपाट विकास संकल्प संघटना व राजीव गांधी पंचायतीराज संगठन,शिवसेना उध्दव ठाकरे ह्यांच्या सहभागाने लक्षवेधी सत्याग्रह ठिय्या आंदोलन करण्यात आले होते सदर आंदोलनाची मा तहसिलदार पेण यांनी दखल घेऊन आंदोलनकर्ते व खारभूमी विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती सदर बैठकीत सकारात्मक चर्चा होवून मागण्याबाबतच्या करण्यात येणार्या कार्यवाईचा खुलासा लेखी स्वरूपात ९एप्रिल २०२५ पर्यंत देण्याचे आश्वासन दिले व उघाडीची कामे १० में २०२५ पर्यंत करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे १०मे २०२५ पर्यंत सदर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे
आंदोलनातील मागण्या पुढीलप्रमाणे:-
१)दिनांक २/४/२०२५ रोजीच्या भरतीमुळे उघाडीचे दरवाज्यातुन खारे पाणी खाडी लगतच्या ५०-६० एकर जमीनीमध्ये शिरले आहे त्याचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळणेबाबत
२) उघाडीचे नूतनीकरण होईपर्यंत भरतीचे पाणी शेतात शिरू नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करणेबाबत
३) उघिडिचे काम प्राधान्याने हाती घेण्यात यावे व उघाडिचे काम केल्या खेरीज बांधाच्या कामाचे बील काढण्यात येवू नये
४) पाऊस नसतांना रेनकोट सारखेच नूतनीकरण केलेल्या बांधावा जे तडे गेलेत त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यात यावी सदर तडे हे कोरड्यि मातीवर बांधाच्या माथ्यावर ओली चिखलमखतीचा लोड टाकल्याने तडे गेलेत तरी सदर तडे गेलेल्या ठिकाणी टाकलेली माती जेसीपीने काढून रोलींग करून खाली चिखल माती व वर कोरडी माती टाकण्यात यावी
५) सदर बांधवांचे कामात वापरण्यात येण्यारृ मातीचेबाबत ग्रामस्थ शेतकर्यांनी केलेल्या तक्रारिंचे निराकरण करणेबाबत
६) भरावासाठी वापरण्यात येणार्या मातीचे तपासणी अहवालाची प्रत सार्वजनिक करणेबाबत
७) सदर कामासाठी हेटवणे कालव्याच्या भरावाची मुरुम माती वापरण्याची परवानगी जलसंपदा विभागाकडून घेवून सदर माती वापरणेबाबत
८) बांधाचे काम करतांना रिंगवाल टाकून काम करणेबाबत
९) गरगे टाकण्यासाठीच्या ठिकाणांची यादी करुन सदर ठिकाणी योग्य आकाराच्या दगडाचे गरगे टाकणेबाबत
१०) बंदिस्तीचा काही मीटर बांध जो इस्टिमेटमध्ये दाखविला नाही त्याचे काम करणेबाबत
११)सदर कामाचे नूतनीकरणाचे दरम्यान उपयोजना न केल्याने भरतीचे पाणी शेतात शिरल्यास होणाऱ्या नुकसानीची भरपाई साठी तरतूद करणेबाबत
१२) नूतनीकरणाचे कामा करण्यापूर्वीचा बांध नवीन बांधवांचे कामातून वजा करून त्याचे मूल्यांकनाची प्रत मिळावी व जुन्या कामाचे नवीन कामासोबत मूल्यांकन करून नये
१३) २/४/२०२५ रोजी शेतात खारे पाणी शिरल्यानंतर महसूल यंत्रणेने संबंधित विभागास केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती
१४) नूतनीकरणापैकी आजवर केलेल्या कामाचे अदा केल्या बीलाची माहिती मिळावी
إرسال تعليق