शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

संकटांना पायदळी तुडवून जीवनामध्ये यश आत्मसात करा- ह.भ.प.बालाजी महाराज बोराडे

संकटांना पायदळी तुडवून जीवनामध्ये यश आत्मसात करा- ह.भ.प.बालाजी महाराज बोराडे

परंडा प्रतिनिधी हुसेन शेख : - राज कोचिंग क्लासेस परंडा येथील विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.यामध्ये राजकन्या शिवाजी शिंदे या विद्यार्थिनीची शहरी विभागातून नवोदय विद्यालय तुळजापूर येथे निवड झाली असून सई तानाजी मिसाळ या विद्यार्थिनीची ग्रामीण विभागातून नवोदय विद्यालय तुळजापूर येथे निवड झाली आहे.त्याबद्दल या विद्यार्थ्यांचा राज कोचिंग क्लासेस च्या वतीने राज कोचिंग क्लासेस परंडा येथे हार, शाल,फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.तसेच पालकांच्या वतीने स्पर्धा परीक्षेतील यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षक सुजित देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला.
   यावेळी विद्यार्थ्यांना नामांकित ह.भ.प बालाजी महाराज बोराडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.यावेळी पालक शिवाजी शिंदे, तानाजी मिसाळ, कोमल ठाकूर, सोहेल मोरवे, महेश नलवडे, शंकर धोंगडे, राज कोचिंग क्लासेस चे संचालक सुजित देशमुख व विद्यार्थी आदी उपस्थित होते. २०१४ पासून ते आतापर्यंत या क्लासेसचे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत एकूण २८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तसेच २०१७ पासून ते आतापर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण 35 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. राज कोचिंग क्लासेसची यशस्वी  निकालाची परंपरा कायम राखल्याने परंडा तालुक्यातील विविध खेड्यातील विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी ओढा वाढत चालला आहे.या विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्यामुळे शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे पालक वर्गातून कौतुक होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم