शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

५ तोळ्याची गंठण चोरणाऱ्या दोन महिलांना 24 तासात टेंभुर्णी पोलिसांनी केले जेरबंद "टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे डीबी पथकाची कौतुकास्पद कारवाई "


              धनंजय काळे
                   पुणे जिल्हा प्रतिनिधी 
         टेंभुर्णी -- दिनांक २१/०६/२०२५ रोजी सौ. सविता नागनाथ लोंढे राहणार लाल डोंगर, चेंबूर मुंबई हया दुपारी १.४५ वा. चे सुमारास टेंभुर्णी बस स्टॅन्ड येथे आल्या होत्या. तेथून त्या सातारा येथे नातेवाईकाचे लग्न कार्यासाठी जाणेसाठी बसमध्ये चढत असतांना प्रवाशी लोकांचे गर्दीमध्ये कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे पर्समधून ५ तोळयाचे सोन्याचे गंठण असलेले पाकीट हे चोरून नेले होते. त्याबाबत सविता लोंढे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाणेमध्ये फिर्याद दिली होती.

        सदर चोरीतील अज्ञात चोरटयांचा शोध घेणेकरीता टेंभुर्णी पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक श्री. नारायण पवार यांनी डि बी पथकाचे पोलीस उप निरिक्षक कुलदिप सोनटक्के व त्यांचे टिमला तपासाबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे टेंभुर्णी पोलीस ठाणेचे डि बी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी लगेच अज्ञात चोरटयाचा शोध चालू करून टेंभुर्णी शहर व परिसर पिंजून काढून अज्ञात चोरटयाचा शोध घेत असतांना दिनांक २२/०६/२०२५ रोजी टेंभुर्णी परिसरात दोन महिला हया संशयीतपणे फिरत असतांना त्यांना दिसून आल्या त्या पोलीसांना पळून जाणेच्या प्रयत्नात असतांना त्यांना महिला पोलीसांकरवी शिताफीने पकडले. त्यांची नांवे १) नंदिनी शिवाजी काळे वय १९ वर्षे २) श्रीमती मैनाबाई किसन कांबळे वय ५५ वर्षे दोधी रा. विलासनगर, लातूर अशी असल्याची त्यांनी सांगितली. त्यांचे अंगझडतीमध्ये ४,००,०००/- रूपये किंमतीचा एक ५ तोळयाचा गंठण पाकीटसह मिळून आला. त्याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी तो गंठण हा दिनांक २१/०६/२०२५ रोजी दुपारी १.४५ वाजण्याचे सुमारास टेंभुर्णी बस स्टॅन्ड येथे एका महिलेच्या पर्समधून चोरी केली असल्याचे
        सांगून गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांना अटक करण्यात आलेली असून गुन्हयाचा तपास डि बी पथकाचे पोलीस हवालदार /९५ विलास नलवडे हे करीत आहेत.

         सदर महिला चोरांना टेंभुर्णी पोलीस ठाणेचे डि बी पथकाचे अधिकारी/अंमलदार यांनी गुन्हा घडल्यापासून २४ तासाचे आतमध्ये जेरबंद करण्याची कौशल्यपूर्ण कामगिरी केलेली आहे.

         सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रितम यावलकर साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा उपविभाग श्री. अजीत पाटील साहेब व मा. पोलीस निरिक्षक श्री. नारायण पवार यांचे मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस ठाणेचे डि बी पथकाचे पोलीस उप निरिक्षक कुलदिप सोनटक्के व त्यांचे पथकातील पोहेकॉ/९५ विलास नलवडे, पोहेकॉ/१७४६ संदिप गिरमकर, पोकॉ/११२५ महेश साळी, पोकॉ/६८२ मोहन तळेकर, पोकों/१३३४ सुरन मुलाणी, पोकों/६७३ अक्षय कांबळे, पोकों / १२८२ अक्षय सरडे व महिला पोकॉ/२२४१ पुनम देवकर यांनी केलेली असून चोरीचे गुन्हयातील महिला चोरांना २४ तासाचे आत टेंभुर्णी पोलीसांनी जेरबंद केल्याने टेंभुर्णी परिसरातील नागरिकांकडून टेंभुर्णी पोलीसांचे कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم