शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

फुरसुंगी उरुळी देवाची सर्कल व तलाठी कार्यालयासाठी इमारत फर्निचर व संबंध साहित्यच्या निधीसाठी मागणी....

           
          गणेश कांबळे 
                      प्रतिनिधी 
          फुरसुंगी-उरुळी
भाजप नेते धनंजय आप्पा कामठे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे  निवेदनाद्वारे  मागणी केली

पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी-उरुळी देवाची परिसरातील सर्कल ऑफिस व तलाठी कार्यालय अद्याप प्राथमिक स्वरूपात कार्यरत असून, याठिकाणी नागरिकांना मूलभूत सुविधा अपुरी पडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी एक आधुनिक व सुसज्ज इमारत, फर्निचर, संगणक आणि इतर शासकीय कामकाजासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने निधी मंजूर करावा, अशी ठोस मागणी भाजप नेते धनंजय आप्पा कामठे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत महसूलमंत्री बावनकुळे यांनीही त्वरित दखल घेत पुणे जिल्हाधिकारी यांना आवश्यक कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने धनंजय आप्पा कामठे यांनी जिल्हाधिकारी डॉ. सुनीता कदम मॅडम यांची भेट घेऊन या प्रस्तावाबाबत सविस्तर चर्चा केली व स्थानिक नागरिकांच्या अडचणी समोर ठेवून लवकरच निधी उपलब्ध करावा अशी मागणी   केली.

सध्या फुरसुंगी-उरुळी देवाची परिसरात नागरिकांची वाढती लोकसंख्या, नागरी सुविधा आणि महसूल विभागाशी संबंधित कामकाजाचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र तलाठी व सर्कल कार्यालयांच्या इमारती अत्यंत छोट्या स्वरूपाच्या असून, ना योग्य बैठक व्यवस्था आहे, ना आवश्यक संगणकीय साधने. यामुळे नागरिकांना सेवांसाठी मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण होत आहेत.

         या पार्श्वभूमीवर तलाठी व सर्कल कार्यालयासाठी स्वतंत्र व अद्ययावत इमारत, आवश्यक फर्निचर, संगणक, प्रिंटर, इंटरनेट सुविधा आदींसाठी शासन स्तरावरून भरीव निधी मंजूर करावा, अशी आग्रही मागणी भाजप नेते धनंजय आप्पा कामठे, केशव तात्या कामठे, सागर शेठ खुटवड, संदीप शेठ परदेशी, कैलास शेठ शेवाळे, संतोष शेठ  हरपळे ,संकेत शेठ बर्गे या स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم