मोहसीन आतार
सोलापूर शहर प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सोलापूर काँग्रेस भवन येथे अभिवादन कार्यक्रम पार पडला. शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
या वेळी चेतन भाऊ नरोटे म्हणाले की राजीव गांधी यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांचे देशाच्या प्रगतीसाठीचे योगदान स्मरण केले. तंत्रज्ञानाचा विकास, शिक्षण, युवकांना संधी तसेच ग्रामपंचायतींना स्वायत्तता देण्यात राजीव गांधींचा मोठा वाटा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमास माजी माहापौर अलकाताई राठोड प्रदेश सचिव विनोद दादा भोसले श्रीशैल रणदिरे महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवडे माजी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर सुमन जाधव भटक्या मुक्त विभागाचे अध्यक्ष युवराज जाधव अध्यक्ष सिद्धाराम चाकोते अनिल मस्के लखन गायकवाड मेघशम गौडा सुभाष वाघमारे रफिक चकोले संजय गायकवाड नूर अहमद नालवार प्रकाश माने ज्योती गायकवाड मुमताज तांबोळी रुकियाबानू बिराजदार अश्विनी सोलापुरे मोहसीन फुलारे तौसिब शेख शिवाजी साळुंखे दत्तात्रय गजभार नागनाथ शावणे अभिलाष अच्युगटला गुणसिद्ध मोठे रेवणसिद्ध न्यामगोंडे हाजी महमूद शेख आदी शहर काँग्रेस कमिटीतील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
إرسال تعليق