शिवाजी पवार
इंदापूर प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या इंदापूर मध्य मंडलाची नव्याने गठित कार्यकारिणीची अधिकृत घोषणा तालुकाध्यक्ष राजकुमार जठार यांनी केली.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण,जिल्हाध्यक्ष शेखर वढणे , भाजपा युवा नेते प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
सामाजिक व संघटनेतील काम पाहुन सत्यजीत रणवरे यांची भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्ष पदी तर सुरज पिसे यांची सरचिटणीस पदी वरिष्ठांन कडून निवड करण्यात आली आहे.
यावेळी नव्याने उपाध्यक्ष पदी निवड झालेल्या सत्यजीत रणवरे यांनी सांगितले की भाजपा पक्षाच्या नेतृत्वाने टाकलेल्या विश्वासाला आपण बांधील राहून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा,स्थानिक विकास, जनसंपर्क, आणि पक्ष विस्ताराच्या दृष्टीने कार्यरत राहणार असून सर्व सामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासकीय व प्रशासकीय पातळीवर कटिबद्ध राहणार आहे.
सत्यजीत रणवरे व सुरज पिसे यांच्या निवडी नंतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते,पदाधिकारी व नागरिक यांच्या कडून दोघांना हि शुभेच्छा देण्यात आल्या.
إرسال تعليق