रायगड जिल्हा उपसंपादक
पेण एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयात शुक्रवार,दि.१२सप्टेंबर रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब नेने यांच्या स्मृतीदिनाप्रित्यर्थ निवृत्त लष्कर अधिकारी मेजर मैत्रयी दांडेकर यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.सदर व्याख्यानासाठी नेने महाविद्यालयाचे आधारस्तंभ ॲड बापुसाहेब नेने,संस्थेचे अध्यक्ष ॲड मंगेश नेने , संस्थेचे उपकार्याध्यक्ष श्री.कडू,सदस्या डॉ.नीता कदम, श्री.विनायक गोखले, नेने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सदानंद धारप,विविध शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक,प्राध्यापक,पेण
परिसरातील नागरिक आणि विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
दीपप्रज्वलन आणि भाऊसाहेब नेने यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सदानंद धारप यांनी आपल्या प्रास्ताविकात भाऊसाहेब नेने यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाबद्दल त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करत सदर व्याख्यानमाला व नेने महाविद्यालयात साजरे होणारे विविध कृतीशील उपक्रम म्हणजे भाऊसाहेबांनी सुरु केलेला शैक्षणिक यज्ञ व विचारमंथनाचे कार्य अव्याहतपणे चालू ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे सांगितले.यानंतर प्रमुख वक्त्या मेजर मैत्रयी दांडेकर यांनी उपस्थित श्रोत्यांसोबत मनमोकळा संवाद साधत लष्करातील आपला अनुभव स्लाईड शोच्या माध्यमातून अंत्यंत रोचक शब्दांत उलगडून सांगितला.यावेळी त्यांनी आपल्या निश्चित
धैय्यप्राप्तीसाठी मेहनतीसोबतंच मनोनिग्रह आवश्यक असल्याचे सांगितले. यानंतर उपस्थितांच्या शकांचे समाधान प्रमुख वक्त्यांकडून करण्यात आले.
अध्यक्षिय मनोगतात संस्थेचे अध्यक्ष अॅड मंगेश नेने यांनी व्याख्यात्या मेजर दांडेकर यांच्याकडून प्रेरणा घेत स्वत:ला कसाला लावत कठोर मेहनतीतून स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.यानंतर आभारप्रदर्शन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वैदैही जोशी यांनी,आभारप्रदर्शन प्रा.राधिका गोंधळी यांनी केले तर वक्त्यांचा परिचय प्रा.पंकज पाटील यांनी करुन दिला.सांस्कृतिक विभागाने सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
إرسال تعليق