शिवाजी पवार
इंदापूर प्रतिनिधी
*रेशीम दिन आणि मेरा रेशम मेरा अभिमान* या निमित्तानेजिल्हा रेशीम कार्यालय पुणे व केंद्रीय रेशीम मंडळ बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने *इंदापूर तालुक्यात ग्रामपंचायत कार्यालय नीरवांगी* येथे एकदिवसीय रेशीम कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेत केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ डॉ. सुनील राठोड यांनी रेशीम किटक व तुतीवरील रोग आणि उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा रेशीम विकास अधिकारी संजय फुले यांनी कोश विक्री, कोश मार्केट, रेशीम योजना व कोशोत्तर प्रक्रिया, प्रशिक्षण याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी आजपासून जिल्ह्यात शासनाची “रेशीम विभाग आपल्या दारी मोहीम २०२५” सुरु झाल्याचे सांगितले.
ज्या शेतकऱ्यांनी सन २०२३-२४ व २०२४-२५ या कालावधीत तुती लागवडीकरिता नोंदणी शुल्क भरूनही लागवड न करू शकलेल्या शेतकऱ्यांना चालू वर्षी शुल्क न भरता तुती लागवडीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अजिंक्य चॉकी सेंटर निरवांगी यांचेकडून श्री आसिफ तांबोळी पळसदेव, गणेश उत्तम कोरटकर सुरवड, ओंकार मारकड रुई या शेतकऱ्यांचा ट्रॉफी तापमान आद्रता मापक उपकरण देऊन सत्कार करण्यात आला. म्हसोबावाडी येथील रेशीम उत्पादक शेतकरी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दशरथ पोळ पाटील, निराभिमा साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय पोळ, ग्रामपंचतीचे पदाधिकारी,
या कार्यशाळेस इंदापूर तालुका, सोलापूर जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
إرسال تعليق