अहिल्यानगर प्रतिनिधी
शेतकरी विकास मंडळाने नेते राजू शेटे यांनी कारखाना संचालक मंडळाचा सत्कार निवडणूकी पुरता विरोध, चांगल्या कामासाठी तुमच्या बरोबर डाॅ.तनपुरे साखर कारखान्यासाठी आनखी काही कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी काही तांत्रिक बाबी दोन महिन्यात पूर्ण करून येत्या काळात जिल्हा बँकेकडून हा कारखाना सोडवून कारखानाच्या अंतर्गत यांत्रिकीकरणाच्या दुरूस्तीचे काम पुर्ण करून लवकरच गळीत हंगाम सुरू करू असे आश्वासन कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी दिले आहे.
राहुरी येथील डाॅ.बाबुराव बाबुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची ६८ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधरण सभा आज मंगळवारी सकाळी राहुरी काॅलेजच्या सभागृहात संपन्न झाली आहे. सभेच्या अध्यस्थांनी अरूण तनपुरे होते तर व्यासपीठावर सुरेशशेठ वाबळे, रावसाहेब चाचा तनपुरे, हर्ष तनपुरे, सुनिल मोरे, राजुभाऊ शेटे, नानासाहेब जुंदरे, प्रकाश देठे, अशोक उ-हे, ज्ञानेश्वर कोळसे, गणेश गाडे,भास्कर ढोकणे, प्रमोद तारडे, सुनिल आडसुरे, मच्छिंद्र सोनवने, सर्जेराव गाडे, नितीन बाफना, रामदास बाचकर,दत्तात्रय कवाने, भारत वारूळे, ज्ञानेश्वर पवार,कृष्णा मुसमाडे,अमृत धुमाळ, पंडुतात्या पवार,भास्कर ढोकणे, आबासाहेब वाळुंज आदिंसह मान्यवर होते.
यावेळी बोलताना तनपुरे म्हणाले की, कारखान्याच्या कर्जासाठी ऑडिट होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे अडचणींचा सामना करून ह्या कारखान्याचे ऑडिट केले.लवकरच श्वेतपत्रिका काढून कमी व्याज दराने कर्ज घेऊन मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. तसेच कारखान्याची अतिक्रमित जमिन सोडविण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहे. शाळा व महाविद्यालयात सुधारणा करून दिड वर्षात सर्व संस्था नावारूपाला येतील असे त्यांनी सांगीतले.
डाॅ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये शेतकरी नेते संजय पोटे आणि कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली. कारखाना बंद असताना आपण कारखान्याचे ऑडिट का केले ?असा सवाल पोटे यांनी उपस्थित करताच अरूण तनपुरे चांगलेच भडकले. विषयावर बोला ,विषय सोडुन बोलु नका अस म्हणत ऑडिट करणं का गरजेचं असतं असं त्यांनी यावेळी आपल्या भाषणातुन बोलताना सांगितले.
डॉ. तनपुरे साखर कारखान्यामध्ये जनसेवा मंडळाविरोधात शेतकरी विकास मंडळाने निवडणूक लढवली होती. मात्र निवडणूक झाल्यानंतर पहिल्याच वार्षिक सभेत शेतकरी विकास मंडळाचे नेते राजूभाऊ शेटे यांनी अध्यक्ष अरुण तनपुरेंसह सर्व संचालक मंडळांचा सत्कार करून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी बोलताना शेटे म्हणाले की, निवडणूक संपली विरोध संपला येणाऱ्या काळामध्ये तालुक्याच्या कामधेनूच्या बाबतीत सकारात्मक आणि चांगल्या कामासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि जेथे तुम्हाला आमची गरज पडेल तेथे आवाज द्या आम्ही नक्कीच उभे राहू असे देखील त्यांनी सांगितले. कार्यक्षेत्रातला ऊस कोणीही पळविला तर गाठ आमच्याशी आहे असं म्हणत त्यांनी कारखान्याच्या हितासंदर्भात इतरांना इशारा दिला आहे.
إرسال تعليق