शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

ॲड. प्रकाश संसारे यांची ज्ञानमाता सेवाभावी संस्थेच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड

       
              जालिंदर आल्हाट
                        अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी 
राहुरी न्यायलयात कामकाज करणारे तसेच देवळाली प्रवार येथील ॲड . प्रकाश संसारे हे
 लोकांचे कायद्याद्वारे प्रबोधन करुन जनजागृती करून गोर गरीबांना न्याय मिळवून देण्याचे काम करत असतांना पुणे येथील ज्ञानमाता सेवाभावी संस्था. या संस्थेतर्फे माहिती अधिकार नागरिक समूह आयोजित तिसऱ्या अधिवेशन प्रसंगी राज्यस्तरीय पुरस्कारासाठी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील ॲड. प्रकाश संसारे यांच्या कामाची दरवल घेऊन 

संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आढाव यांच्या सहीने निवडीचे पत्र ॲड. प्रकाश संसारे यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. संस्थेच्या निवड पत्रात म्हटले आहे की, माहिती अधिकार नागरिक समूह आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशन प्रसंगी राज्यस्तरीय पुरस्कारासाठी आपली निवड करण्यात आलेली आहे.


या पुरस्काराद्वारे महाराष्ट्रच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत समाजसेवकांचा गौरव व सन्मान केला जातो. शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, न्यायिक, साहित्यिक, पत्रकारिता तसेच माहिती अधिकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यामध्ये सन्मान केला जातो. त्या मान्यवरांच्या यादीत आपले नाव समाविष्ट झाल्याचा आम्हास अभिमान आहे.


सदर प्रसंगी आपणास सन्मानचिन्ह व मानपत्र प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. पुणे येरवडा येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात रविवार १२ ऑक्टोबर २०२५ सकाळी १० वा. वितरण होणार, असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आढाव यांनी दिली.

Post a Comment

أحدث أقدم