शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

धरणे आंदोलनाच्या १० व्या दिवशी कानगांव मधील शेतकरी आक्रमक* . अंगावरील कपडे जाळून शासनाचा केला निषेध ....

       नेताजी खराडे
             दौंड तालुका प्रतिनिधी 

 शेतकरी आकृती समितीच्या वतीने कानगाव येथील विठ्ठल मंदिरामध्ये धरणे आंदोलन चालू आहे .या आंदोलनाचा आज दहावा दिवस असून अध्याप शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले व अंगावरील कपडे जाळून शासनाचा जाहीर निषेध केला. कांद्याला ३५ रुपये हमीभाव मिळावा. संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी. शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत. अशा इतर मागण्यासाठी चालू असलेल्या धरणे आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी आज आक्रमक होत आंदोलन केले. आज शेतकरी चारी बाजूंनी आर्थिक संकटांमध्ये सापडला आहे. शासनाच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांच्या कुठल्याच शेतीमालाला बाजार भाव नाही व अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आज शेतकऱ्यांना शाळेतील फी भरण्यासाठी पैसे नाहीत. दवाखान्यांमध्ये बिल भरण्यासाठी पैसे नाहीत ,उदरनिर्वासाठी सुद्धा पैशाची चंचन भासत आहे .
    
 शेतीच्या पुढील भांडवलासाठी पैसे नाहीत. अशी अवस्था असताना शासन प्रशासन फक्त अतिवृष्टी पाहणी दौऱ्याच नाटक करून वेळ काढूपणा करत आहेत. वास्तविक पाहता ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणे गरजेचे असून,शेतीमालाला हमीभाव मिळावा. यासाठी ठोस धोरण राबवण्याची गरज आहे. नाहीतर थोड्या दिवसांमध्ये नेपाळ सारखी परिस्थिती भारतामध्ये सुद्धा होऊ शकते. 
  
     याचे भान शासनाने ठेवणे गरजेचे आहे. उद्योगपतींना १६ लाख कोटींची कर्जमाफी मिळते, टॅक्स माफी मिळते व त्यांचे कर्ज लाखो कोटींचे कर्ज राईट ऑफ केले जाते. परंतु शेतकऱ्यांना मात्र आठ आणि दहा हजार रुपये देऊन बोलवणूक केली जाते. शेतकऱ्यांना सुद्धा अर्थशास्त्र चांगलं कळतं.त्यामुळे शासनाने वेळीच योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावे. या आंदोलनावेळी भानुदास शिंदे, नानासो नलवडे .किसन चौधरी, तुकाराम फडके, श्रीधर नलवडे ,काका कोंडे ,सयाजी मोरे, गणपत नलावडे, नामदेव फडके, भाऊसाहेब फडके, संभाजी निगडे, दादासो गवळी ,राजेंद्र गवळी ,अनिल फडके, डॉक्टर बापूराव फडके, सदाशिव चौधरी, मोहन धावडे, चंद्रकांत चाबुकस्वार, चंद्रकांत कोर्हाळे ,जगन्नाथ मेटे,पापाभाई शेख ,निलेश मोरे, अक्षय जाधव ,गोरख कोर्हाळे,ज्ञानदेव गुंड, शामराव फडके, दत्तात्रय फडके, अनिल मोरे ,सोपान हरगुडे ,रामदास पवार, इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم