शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पुणे शहरात..... घरगुती गॅस सिलेंडरसमुळे गॅस चोरी करणारी टोळी अटक ... वानवडी पोलिसांची मोठी कामगिरी

.        गणेश कांबळे
              उपसंपादक औ

पुणे :
पुणे शहरात गणेशोत्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर वानवडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत घरगुती भारत गॅस सिलेंडरचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलेंडर अनधिकृतपणे व्यावसायिक वापरासाठी पुरवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस आयुक्त पुणे शहर यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबवण्यात आली.

दि. ४ सप्टेंबर रोजी वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्ती घरगुती भारत गॅस सिलेंडर व्यावसायिक हॉटेल, रेस्टॉरंट व इतर व्यावसायिक ठिकाणी विक्री करत होते. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन ट्रकसह घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले.

या कारवाईत १) विक्रमसिंह ठाकुर (वय २०, रा. राजसनगर, वानवडी, पुणे), २) योगेश बांगलादेशी कुमार (वय ३५, रा. राजस्थानी समाजनगर, मणजरी, पुणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून २ ट्रक, मोठ्या प्रमाणात घरगुती सिलेंडर, रेग्युलेटर व गॅस पाईप जप्त केले आहेत.

पोलिस चौकशीत आरोपींकडून धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी “आधि स्मृती भारत गॅस एजन्सी, माळवाडी रोड, हडपसर, पुणे” या ठिकाणाहून घरगुती सिलेंडर मोठ्या प्रमाणात आणून ते हॉटेल व व्यावसायिक ठिकाणी वितरित करीत होते. एका सिलेंडरची काळ्या बाजारात ९ किलोमीटरच्या आत ५०० ते ६०० रुपयांना विक्री होत असल्याचे उघड झाले आहे.
ही सिलेंडर विक्री करून आरोपींनी लाखो रुपयांचा गोरखधंदा केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाईत एकूण २,३४,१६०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५ राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, घरगुती गॅस सिलेंडर व्यावसायिक वापरासाठी विक्री होत असल्याचे आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. गणेशोत्सवासारख्या उत्सवी काळात अशा बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे.

 बनावट सिलेंडर विक्री प्रकरणामुळे पुण्यात खळबळ उडाली असून, या कारवाईनंतर अशा प्रकारचे अनेक गोरखधंदे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

أحدث أقدم