शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

बेवनूर विकास सेवा सोसायटीत कर्ज वितरणात गोलमाल सचिव सुनील कुलकर्णी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप



      
      अजित काळेल
                  संपादक 
              
बेवनूर—स्थानीय विकासासाठी काम करणाऱ्या बेवनूर विकास सेवा सोसायटीमध्ये कर्ज वितरण प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार उजेडात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1950 नुसार ज्या उद्देशाने या सहकारी संस्थांची स्थापना केली गेली शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कर्जवाटप करणे आणि त्यांना सवलत देऊन त्यांना एक प्रकारे प्रोत्साहन देणे परंतु हा उद्देश बेवनुर विकास सेवा सहकारी सोसायटीमध्ये फारसा दिसून येत नाही ,या अगोदर सुद्धा कर्जमाफीच्या प्रकरणांमध्ये गोलमाल झाल्याचे काही प्रमाणात दिसून आले आहे. 

सोसायटीचे सचिव श्री कुलकर्णी यांनी कर्ज वाटपात अनुचित लाभ घेतल्याचा गंभीर आरोप सोसायटीच्या सभासदांकडून करण्यात येत आहे. मात्र, या आरोपांची गंभीरता जाणून घेण्याऐवजी सचिव सुनील कुलकर्णी यांनी कर्ज वितरण यादी देण्यास कटाक्षाने मुदत टाळताना आढळले आहे.
सोसायटीच्या सभासदांनी माहिती आधाराखाली कर्ज वाटपाच्या पारदर्शकतेसाठी कर्ज वितरण यादी मागितली असता, अनेक महिने उलटून सुद्धा माहिती देण्यात येत नाही, असे सभासदांच्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे कर्ज वितरण प्रक्रियेवरील विश्वास धोक्यात आला असून सदस्यांमध्ये संताप वाढला आहे.

याच पार्श्वभूमीवर सहाय्यक निबंधक डफळे यांच्याकडून सचिव सुनील कुलकर्णी यांना पाठीशी घालण्याचा प्रकार घडल्याचा देखील गंभीर आरोप होत आहे. अधिकारी स्तरावरील केविलवाणा व अनुचित वर्तनामुळे सहकार्याची अपेक्षा बिघडल्याची भावना अधिकारी वर्गात दिसून येत आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे बेवनूर विकास सेवा सोसायटीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. कर्ज वितरणाच्या प्रक्रियेमध्ये प्रस्तावित सुधारणा आणि सातत्यपूर्ण तपासणीची मागणी सभासद आणि स्थानिक नागरिक करत आहेत. भ्रष्टाचारासंदर्भातील तंतोतंत माहिती सार्वजनिक होण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडे सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

चौकट 

सहाय्यक निबंधक अमोल डफळे हे संयुक्तिक उत्तरे न देता सचिव सुनील कुलकर्णी यांची पाठराखण करत आहेत तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोशींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सभासदांकडून  होत आहे..

Post a Comment

أحدث أقدم