शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

इंदापूर तालुक्यात अशोक देवकर यांची उपाध्यक्षपदी निवड

    

   रणजीत दुपारगोडे
             महाराष्ट्र प्रतिनिधी 
इंदापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षात काम करण्याचा अनुभव असलेले युवा कार्यकर्ते अशोक बाबू देवकर यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. पुणे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांच्या उपस्थितीत देवकर यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
अशोक देवकर यांच्या निवडीने तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरूनही अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना अशोक देवकर म्हणाले की, “मी संघटनेचे प्रामाणिक आणि मनापासून काम करणार असून, संघटनेच्या वाढीसाठी इंदापूर तालुक्यात निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना संघटनेत सामावून घेणार आहे. तसेच संघटनेची बांधणी करून गावोगावी शाखा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे.”
देवकर यांच्या निवडीमुळे वंचित बहुजन युवा आघाडीला तालुक्यात नवीन उर्जा मिळाली असल्याचे मानले जात आहे.

Post a Comment

أحدث أقدم