शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

सासपडे येथे अल्पवयीन मुलीचा खून;नराधम अवघ्या २४तासात जेरबंदस्थानिक गुन्हे शाखा सातारा व बोरगाव पोलीस स्टेशन यांच्या कडून कारवाई ....



      अजित काळेल 
           सातारा जिल्हा संपादक 

सासपडे (ता.सातारा) 
            येथील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय आर्या सागर चव्हाण हिचा शुक्रवारी १० रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरात रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेप्रकरणी प्रचंड संताप हा ग्रामस्थांकडून दिसून आला.संबंधित आरोपीच्या मुसक्या आवळण्याची कामगिरी पोलिसांकडून पार पाडली असून खून करून पसार झालेल्या त्या नराधमास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासात  जेरबंद केले.स्थानिक गुन्हे शाखा सातारा व बोरगाव पोलीस स्टेशन यांच्या कडून कारवाई करण्यात आली आहे.

याबाबतची अधिक माहिती स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या कडून अशी देण्यात आलेली आहे की,दिनांक १०/ रोजी १२.३० ते ०३.०० वाजण्याच्या सुमारास सासपडे ता.जि. सातारा गावामध्ये एका अल्पवयीन शालेय मुलीचा तिच्या घरामध्ये घुसून कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून डोक्यात कशानेतरी मारहाण करून तिचा निघून खुन केला वगैरे दिले मजकुरचे फिर्यादीवरून बोरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर २६३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी  व अपर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडूकर,उप विभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले,पोलीस निरीक्षक अरूण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट दिली. 

      
       त्यावेळी  पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांनी गुन्हयातील आरोपी बाबत माहिती काढुन त्यास ताब्यात घेण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरूण देवकर व बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक, धोंडीराम वाळवेकर यांना दिल्या.त्याप्रमाणे पथके तयार करून तपास पथकांनी सर्वप्रथम घटनास्थळाची पाहणी केली सदरचे घटनास्थळ हे सासपडे ता.जि.सातारा गावातील रहदारीच्या ठिकाणावर असुन सदर घटनास्थळाचे आजुबाजुला कोणत्याही प्रकारचे सिसिटीव्ही उपलब्ध नसल्याने सदरची गंभीर स्वरूपाची घटना उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीसां समोर होते.
     
       त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटना घडले पासुन सदर परिसरामध्ये ठाण मांडुन गोपनिय बातमीदार तयार करून, गावातील संशयीत इसम तसेच नातेवाईक यांच्याकडे कसून चौकशी केली असता काही एक माहिती मिळुन आली नाही.दिनांक ११ रोजी नमूद गुन्हा करणारा संशयीत इसम हा सासपडे ते नागठाणे जाणारे रोडवर खिंडीमध्ये एका टेकडीवर असल्या बाबतची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक, अरूण देवकर यांना प्राप्त झाली.त्याप्रमाणे त्यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखा साताराचे पोउनि विश्वास शिंगाडे,पोहवा अमोल माने,अजित कर्ण,जयवंत खांडके,शिवाजी भिसे,पोकों स्वप्निल दौंड,रविराज वर्णकर यांचे तपास पथक तयार करून त्या तपास पथकास नमुद इसमास ताब्यात घेवून पुढील कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.पोलीस उप निरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या तपास पथकाने सासपडे ते नागठाणे जाणारे रोडवरील टेकडीवर जावुन नमूद इसमाचा शोध घेवुन त्यास अत्यंत शिताफीने ताब्यात घेवुन त्या इसमाकडे गुन्हयाचे अनुषंगाने कौशल्यपूर्ण व सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिलेली आहे.सदरचा झालेला खुनाचा संवेदनशील व गंभीर स्वरूपाचा गुन्हा हा कोणतेही धागेदोरे नसताना उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखा व बोरगांव पोलीस स्टेशन यांना यश प्राप्त झाले आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी,अपर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडुकर,उप विभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर,सहायक पोलीस निरीक्षक रोहित फाणें,पोलीस उप निरीक्षक विश्वास शिंगाडे,परितोष दातीर, पोलीस अंमलदार संतोष सपकाळ,मंगेश महाडीक,अमोल माने, अजित कर्णे,जयवंत खांडके,पंकज बेसके,शिवाजी भिसे,स्वप्निल दौंड,रविराज वर्णेकर,संभाजी साळुंखे तसेच बोरगांव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक.धोंडीराम वाळवेकर,पोलीस अंमलदार निलेश गायकवाड, प्रशांत चव्हाण, मोहन चव्हाण, सतीश पवार, विशाल जाधव,समाधान जाधव,महिला अंमलदार नम्रता जाधव यांनी केली असल्याने पोलीस अधीक्षक तुषार दोशी,अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी कारवाई करणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم