(महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 – शोध सत्याचा, त्याला वास्तवाची धार)
गुलाब शेख
मुखेड (प्रतिनिधी) -- उपसंपादक
मुखेड तालुक्यातील पंचायत समितीच्या १४ गणांसाठी निवडणूक होणार असून, या निवडणुकीपूर्वी तहसील कार्यालयात आरक्षणाची सोडत पार पडली. उपजिल्हाधिकारी अनुप पाटील व तहसीलदार राजेश जाधव यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोडतीत महिला उमेदवारांना मोठं यश मिळालं आहे.
या सोडतीत एकूण १४ गणांपैकी ७ महिला व ७ पुरुष गण निश्चित करण्यात आले. विशेष म्हणजे यावर्षी पंचायत समिती सभापतीपद हे सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव असल्याने या पदासाठी चुरस प्रचंड वाढली आहे.
सोडतीनुसार गणांचे आरक्षण पुढीलप्रमाणे जाहीर झाले –
वरताळा – अनुसूचित जमाती (महिला)
जांब बुद्रुक – अनुसूचित जाती (महिला)
चांडोळा – सर्वसाधारण (महिला)
बेटमोगरा – सर्वसाधारण
एकलारा – सर्वसाधारण (महिला)
जाहूर – सर्वसाधारण
येवती – ओबीसी (महिला)
फोनवरक – अनुसूचित जाती (महिला)
सकनूर – ओबीसी
सावरगाव – अनुसूचित जाती
बराळी – सर्वसाधारण
दापका गुंडोपंत – ओबीसी (महिला)
गोजेगाव – सर्वसाधारण
मुक्रमाबाद – सर्वसाधारण
या सोडतीनंतर मुखेड तालुक्यातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. विशेषतः पंचायत समिती सभापतीपद महिलांसाठी राखीव ठरल्यानंतर अनेक महिला नेत्यांनी तयारीला सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकीत मुखेड तालुका ‘महिलाराज’ अनुभवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
إرسال تعليق