प्रतिनिधी सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (औंध) : ता. 31. आॅक्टोबर "देशासह शहरातील ही वातावरण बदलत असून प्रदूषण नियंत्रण करण्यासह शारिरीक तंदुरुस्तीसाठी सायकल चालवणे गरजेचे आहे" असे मत पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केले.
बॉश ग्लोबल सॉफ्टवेअर (बीजीएसडब्लू) कंपनीच्या वतीने कर्मचाऱ्यांना सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सायकल टू वर्क' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कंपनीचे व्यवस्थाकीय संचालक दत्तात्रेय सलगमे, वरिष्ठ उपाध्यक्ष आर. के. शेनॉय, कौशिक सरकार, उपाध्यक्ष जेकब पीटर, लोकेशन हेड अमित कुमार श्रीवास्तव, आरबीआयसी प्रमुख अविनाश चिंतावर, मनुष्यबळ प्रमुख मोहन पाटील, सुरक्षा प्रमुख विजय काकड यांच्यासह बॉश कंपनीचे बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते. कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्या यासाठी पुढाकार घेत आहेत. हि कौतुकास्पद बाब आहे. परंतु पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. बॉश कंपनीने सुरू केलेला हा उपक्रम इतरांना दिशादर्शक ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दक्षिण भारतातील दोन ठिकाणी हा उपक्रम राबविला असून यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यविषयक जागृती तर झालीच परंतु यामुळे लाखो लीटर इंधनाची बचत झाली तसेच प्रदुषण कमी करण्यासाठी मदत ही झाल्याचे अमितकुमार श्रीवास्तव यांनी यावेळी माहिती देताना सांगितले.
महाळुंगे-बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड ते बालेवाडीतील कंपनीच्या कार्यालयापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी सायकल चालवत या उपक्रमाची सुरुवात केली. यावेळी पोलिस आयुक्त गुप्ता यांनी या रॅलीला झेंडा दाखवून मार्गस्थ केले.

إرسال تعليق