प्रतिनिधी सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे हडपसर : शिक्षणाचा विचार करताना तो शिक्षका बरोबर विद्यार्थी त्याची आवड, क्षमता याचाही केला गेल्यास त्याची योग्य ती फलनिष्पत्ती होते. याच हेतूने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात आय क्यू ए सी च्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील आय क्यू ए सी समन्वयक डॉ पी. एस. तांबडे त अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्य डॉ प्रशांत मुळे, आय क्यू ए सी समन्वयक डॉ आर पी जोशी उपस्थित होते. कार्यशाळेची सुरुवात स्वागताने करण्यात आली. कार्यशाळेचे प्रमुख वक्ते डॉ पी एस तांबडे यांनी नॅक आणि त्याच्याशी संबंधित CO-PO attainment and mapping या विषयी सखोल माहिती दिली. अभ्यासक्रम ते त्यांचे मूल्यमापन या सर्व गोष्टी शिक्षक ठरवितात. विद्यार्थ्यांचे फक्त गुण न बघता त्याची विचारक्षमता, कौशल्य, वर्तन, नाविन्यपूर्ण उपक्रम याचाही विचार केला जाणे आवश्यक आहे. हे सांगताना त्यांनी अभ्यासक्रमाची उद्दिष्टे ही शिक्षक केंद्रीत असतात तर विद्यार्थ्याचा विचार course आणि program outcome मध्ये केलेला असतो. याचे मॅपिंग कसे करायचे, त्यांची प्राप्ती (attainment) करण्याच्या पध्दती त्यांनी सांगितल्या आणि उपस्थितांना hands on training दिले.
डॉ नितीन घोरपडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना outcome based Education हा शिक्षणातील महत्त्वाचा भाग असून उच्च शिक्षणामध्ये तयार केलेला अभ्यासक्रम, तो समजण्याची विद्यार्थ्याची कुवत, त्याचा वापर यांचे मोजमाप होणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे शिकविण्याची पद्धत, अभ्यासक्रम यामध्ये योग्य ते बदल करता येतील. या दृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद असून १५५ शिक्षक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. पी जोशी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ प्रशांत मुळे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ आर. पी. जोशी, डॉ प्रशांत मुळे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.


إرسال تعليق