शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

खूनातील आरोपी ६ तासात जेरबंद लोणी काळभोर पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी


 प्रतिनिधी सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज

पुणे (हवेली) : लोणी काळभोर पोलीस स्टेशन गुर नं ५६७ / २०२२ भादवि कलम ३०२, म.पो. का. कलम ३७(१) सह १३५ या प्रमाणे दाखल गुन्ह्यातील मयत पुरुषाचे नाव सुभाष भगवंत चौधरी वय ५५ वर्षे रा. वडाची वाडी, नायगाव पेठ, ता. हवेली, जि. पुणे याचा धारधार शस्त्राने खुन करुन पसार झालेल्या अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. सुभाष काळे यांनी तपास पथकातील पो.उप.निरीक्षक अमित गोरे व थेऊर पोलीस चौकी प्रभारी अधिकारी पो.उप.निरीक्षक विष्णु देशमुख यांचे दोन गट करून अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी सुचना केल्या.
          त्याप्रमाणे वरील टिम आरोपीचा शोध घेत असताना पो.शि. वीर यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की गुन्हयातील संशयीत नाव संपत चौधरी हा पेठ गावातुन कुंजीरवाडी गावाकडे येणाऱ्या रस्त्यास आडवा असणाऱ्या पुणे सोलापुर रेल्वे ट्रॅक वरील रेल्वे गेटच्या जवळ फिरत असल्याची माहीती मिळाल्याने इतर कर्मचारीसह त्या ठिकाणी गेले. त्यावेळी संपत चौधरी हा पोलीसांना पाहुन पळुन जात होता. त्यावेळी शिताफीने पकडून चौकशी केली असता त्याचे नाव संपत तुकाराम चौधरी वय ४६ वर्षे रा. वडाची वाडी, नायगाव पेठ, ता. हवेली, जि. पुणे असे सांगीतले, 
         सविस्तर चौकशी केली असता त्याने सुभाष भगवंत चौधरी व त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्याने सुभाष चौधरी यांचेवर धारधार लोखंडी कोयत्याने वार करून खुन केल्याची कबुली दिली. 
          त्यास अटक करून पुढील तपासासाठी पोलीस उप निरीक्षक विष्णु देशमुख, हे लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत.
          उल्लेखनीय कामगीरी नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, नम्रता पाटील पोलीस उप-आयुक्त परिमंडळ - ५, बजरंग देसाई सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, दत्तात्रय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर, सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणी काळभोर, यांचे मार्गदशनाखाली मसपोनिरी/ प्रतिभा तांदळे, तपास पथकातील अधिकारी पो.उप निरीक्षक अमित गोरे, यांचे सोबत पो. हवालदार गायकवाड, पो.नाईक देविकर, पो.नाईक नागलोत, पो.नाईक जाधव, पो.शिपाई वीर, पो.शिपाई पवार, पो.शिपाई पुंडे, पो.शिपाई सोनवणे, म.पो.शिपाई फणसे तसेच थेऊर पोलीस चौकी प्रभारी पो.उपनिरीक्षक विष्णु देशमुख, पो.नाईक बनकर, पो.नाईक जगताप यांच्या पथकाने केली. 

Post a Comment

أحدث أقدم