शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मुख्यमंत्री शिंदे यांचा दरे गावी एक दिवसीय मुक्कामी...... अचानक दौर्याने स्थानिक प्रशासनाची पळापळ.


 प्रतिनिधी (कुलदीप मोहिते) 

महाराष्ट्र पोलीस न्यूज


सातारा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा दौरा अचानक काढल्यामुळे प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली. मुख्यमंत्री शिंदे यांचे मूळ गाव दरे येथे आपल्या कुटुंबात समवेत जन्मगावी एक दिवसासाठी आले होते. दि. (ता.३१) दुपारी दीडच्या सुमारास एकनाथ शिंदे यांचे कुटुंबा समवेत हेलिकॉप्टरने मुंबई वरून दरे गावी आगमन झाले. यावेळी सातारा जिल्याचे आयजी मनोज लोहिया, सातारा जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी , सातारा जिल्हा एसपी समीर शेख, कार्यालयीन पोलीस उपस्थित होते. जिल्हाधिकारी जयवंशी व एस पी समीर शेख यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. सातारा जिल्हा पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांना मानवंदना ही देण्यात आली या नंतर खाजगी गाडीतून मुख्यमंत्री दरे गावात रवाना झाले.

           यावेळी दरे गावातील ग्रामस्थ कोयना विभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागताला उपस्थित होते.

          कुटुंबात समवेत कुलदैवत उत्तेश्वराला मुख्यमंत्री आपल्या कुटुंबासह जाऊन अभिषेक करणार आहेत. यानंतर मुख्यमंत्री शिंदे ग्रामस्थांची चर्चा करणार असल्याचे सांगितले जाते.



Post a Comment

أحدث أقدم