शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पंचायत समिती मोखाडा सरपंच युनियन अध्यक्षपदी : प्रकाश भोंडवे यांची निवड


 भाऊ वैजल

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पालघर (मोखाडा) : मोखाडा पंचायत समिती अंतर्गत २२ ग्रामपंचायतींच्या मागील महिन्यातच निवडणुका पार पडल्या ग्रामपंचायती मधून विद्यमान सरपंच प्रकाश भोंडवे यांची "सरपंच युनियन अध्यक्षपदी" जि.प.अध्यक्ष प्रकाशजी निकम यांच्या हस्ते निवड करण्यात आली.

          त्यावेळी जि.प.अध्यक्ष प्रकाशजी निकम यांनी सर्व नवनिर्वाचित सरपंच यांना गावाचा विकास कसा करावा गोर गरिबांच्या मूलभूत गरजा विषयी ग्रामपंचायतीने कसे लक्ष दिले पाहिजे या विषयी मार्गदर्शन केले. व अजून काही अडचणी असल्यास माझ्याशी संपर्क साधा असे सांगितले.

        त्यावेळी सर्व ग्रामपंचायत सरपंच  उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم