शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मोखाडा नगरपंचायतीचे विकासाबाबत वार्ड क्र.15 कडे दुर्लक्ष __


 भाऊ वैजल

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पालघर मोखाडा : मोखाडा फाटा (बिरसा मुंडा चौक) येथे नाशिक, - जव्हार, खोडाळा - मोखाडा या रस्त्याने अनेक येणाऱ्या जाणाऱ्या सरकारी नोकर, पर्यटक, प्रवासी बऱ्याच लोकांची वर्दळ असते. मात्र सुलभ सौचालय" नसल्यामुळे गैरसोय होत आहे. त्या कारणाने उघड्यावर जावे लागते.

         यामुळे येथील दुकानदार व राहणाऱ्या जनतेला एकच प्रश्न उद्भवत आहे. याची विचारपूस स्थानिक नगरसेवक भगवान निकम यांना केली असता वेळोवेळी मागणी करूनही नगरपंचायत प्रशासन या गोष्टीची तेथील जागेची अडचण दाखवत दुर्लक्ष करीत आहे.

         मात्र या पहिले खोडाळारोड ला मिनी बसशेड होते त्या जागी सुलभ सौचालय बांधून द्यावे अशी नगरसेवक व नागरिकांची मागणी आहे.

     वार्ड क्र. १५ मधील तोरनशेत या गावाकडे नगर पंचायत  झाल्यापासून विकासासाठी नगर पंचायतने कोणतेही पाऊल उचलले नाही पथदिवे नाही. पाण्याचे नळ नाही. सिमेंट काँक्रेट रस्ते, फ्लेवर ब्लॉक रस्ते, इतर अशा कोणत्याही सोयी सुविधा दिल्या नाहीत.

     यामुळे त्या वार्डातील जनतेची नाराजी यानगर पंचायतीच्या प्रशासन व लोक प्रतिनिधी वर होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم