शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

इंदापूर पोलीस ठाण्याच्या आवारातच आत्मदहनाचा प्रयत्न ; तब्बल १४ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा__


 

सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (ता. इंदापूर) : २१ नोव्हेंबर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हनुमंत वसंत कदम (रा. गलांडवाडी नं. १, ता. इंदापूर) या व्यक्तीने इंदापूर पोलीस ठाण्यातच अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. 

        मात्र पोलिसांनी वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. 


       आपण आत्मदहन करणार असल्याचे लेखी निवेदन हनुमंत कदम यांनी १० ऑक्टोबर रोजी गृहमंत्री, पोलीस महानिरीक्षक यांच्यासह संबंधित वेगवेगळ्या विभागांना दिले होते.


आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची दखल घेतली जात नसल्याने हताश होऊन आपल्याला हे पाऊल उचलावे लागत असल्याचे हनुमंत कदम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते. या संदर्भात दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी कदम यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कदम आपल्या भूमिकेवर ठाम होते.

             सकाळ पासूनच इंदापूर पोलीस ठाण्याच्या गेटवर पोलीस सावध भूमिकेत उभे होते. खुद्द बारामती विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे देखील उपस्थित होते.

         कदम पोलीस ठाण्याच्या आवारात दाखल होताच त्यांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तात्काळ पोलिसांनी त्यांना रोखल्याने पुढचा अनर्थ टळला.

          गलांडवाडी नं. १ येथील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आपली जागा बळकावण्यासाठी, कुटुंबासह गावातून हुसकावून लावण्यासाठी मागील १० वर्षापासून आपल्यावर फौजदारी बल प्रयोग केले. आपला शारीरिक, मानसिक छळ केला. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने आपली दखल घेतली नाही. शेवटी हतबल होऊन आपल्याला आत्मदहन सारखे पाऊल उचलावे लागत आहे. विशेष म्हणजे निवेदनात त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याच्या अनेक अधिकाऱ्यांवर देखील आरोपींशी संगनमत करून पुरावा नष्ट करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. 


कदम यांच्या तक्रारीवरून १४ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा___


हनुमंत कदम यांच्या तक्रारीवरून १७ ऑगस्ट २०२२ रोजी ४ ग्रामसेवक, २ विस्तार अधिकारी, एक माजी सरपंच आणि दोघा वकीलांसह एकूण १४ जणांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ४२०, ४६८, ४७१ अंतर्गत फसवणुकीचा, कट कारस्थान करून शासकीय कागदपत्रांमध्ये छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र यामध्येही काही अधिकाऱ्यांना वाचवण्यात आल्याचा आणि तपासाला लखवा मारल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


या आत्मदहनाला एक नागरिक परावृत्त कसा होतो. याची पोलीस, महसूल अधिकारी, राजकीय पुढारी व वकील यांची खातेनिहाय चौकशी होणार का ❓एका सामान्य नागरिकाला न्याय मिळणार का ❓ हा येणारा काळच ठरवले.

Post a Comment

أحدث أقدم