प्रतिनिधी (सुनिल थोरात)
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (हवेली) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे भूतपूर्व अध्यक्ष, शिक्षणमंत्री प्रा रामकृष्ण मोरे यांचे शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात त्यांचा स्मृतीदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
प्रा.रामकृष्ण मोरे यांच्या प्रतिमेचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्याविषयी मनोगत व्यक्त करताना त्यांनी घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांपैकी पहिलीपासून इंग्रजी आणि शाळेच्या दाखल्यावर आईचे नाव हे महत्त्वाचे निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना शैक्षणिक दृष्टी असल्याने काळाची पावले ओळखून संस्थेमध्ये पूर्वीच संगणक शाखा, शॉर्ट टर्म कोर्स यांची सुरवात केल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा नितीन लगड यांनी तर आभार प्रदर्शन डॉ प्रशांत मुळे यांनी केले. यानंतर महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग आणि भारत सरकार महिला व बालविकास मंत्रालय अंतर्गत सखी एक थांबा केंद्र पुणे यांच्या संयुक्त वतीने "महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी व समुपदेशन" या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून श्रीमती सरिता वाडेकर व श्रीमती सुचित्रा जाधव, महाविद्यालयाचे डॉ. प्राचार्य नितीन घोरपडे, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ वर्षा खांदेवाले, भूगोल विषयाच्या प्रा. शितल गायकवाड या देखील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संगिता देवकर यांनी केले. यानंतर सखी एक थांबा केंद्र क्रमांक-1 च्या समुपदेशक सरिता वाडेकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यामध्ये समस्याग्रस्त महिला व मुलींच्या सर्वांगीण समस्या जाणून घेऊन त्यांना मदत, मानसिक स्वास्थ्य सहाय्य, कायदेशीर मदत व समुपदेशन, आपत्कालीन प्रतिसाद व मदत सेवा, वैद्यकीय सहाय्य, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवा, निवारा अशी विविध प्रकारची मदत केंद्राच्या वतीने केली जाईल याची माहिती दिली.. गरजू महिला व मुलींनी 81 77 95 51 81 किंवा 181 या नंबर वर संपर्क केल्यास त्यांना त्वरित मदत मिळेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी केंद्राच्या श्रीमती सुचित्रा जाधव यांनी देखील महिला व मुलींची समस्या गोपनीय कशा पद्धतीने ठेवल्या जातील याविषयी मार्गदर्शन केले. स्त्रियांच्या मानसिक स्वास्थ्याशी संबंधित विविध प्रकारच्या व्याख्यानांचे व कार्यशाळांचे आयोजन महाविद्यालयांमध्ये यापुढे देखील केले जाईल याबद्दल त्यांनी माहिती सांगितली.
व्याख्यानासाठी इंग्रजी विभागाच्या विभाग प्रमुख वर्षा खांदेवाले यांनी उपस्थित यांचे आभार मानले.
महाविद्यालयातील 120 मुले, मुली व प्राध्यापक उपस्थित होते. व्याख्यानाचे आयोजन मानसशास्त्र विभागाच्या प्रा.अश्विनी डोके व प्रा. संगीता देवकर यांनी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.


إرسال تعليق