महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (ता. इंदापूर) : बिजवडी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वनगळी गावात पाणी व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडलेले असुन. ऐन सरत्या हिवाळ्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रुप ग्रामपंचायत बिजवडी या ग्रामपंचायतचे मतदान तोडावर आलेले आसुन प्रत्येक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत मात्र गावातील नागरीकांना आंघोळी साठी पाणी नाही.
उमेदवार जोमात तर नागरीक मात्र कोमात जान्याची वेळे जनतेवर आली असल्याने जनतेतुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. सध्या गावात चार चार दिवस पाणी येत नसुन कोणाला ही मतदान करा जनतेचे हाल ठरलेलेच आहेत असीच चर्चा जनतेत ऐकायला मिळत आहे.
प्रत्येक उमेदवार आपला जाहीरनामा जाहीर करतोय परंतु नागरीक मात्र म्हनतात आज मरा अन उद्या पाय धरा काय कामाचे आज पाणी नाही नुसता जाहीर नामा व आश्वासन काय कामाचे. पाणीपुरवठा सुरळीत केला जात नसल्याने रहिवाशांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
नळाला दिवसातून केवळ ५ ते १० मिनिटेच पाणी तेही कमी दाबाने व अत्यल्प प्रमाणात पाणी येत होते आता तेही येत नाही. नियोजनशून्य कारभारामुळे अभूतपूर्व पाणीटंचाई उद्भवली आहे. परिणामी नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

إرسال تعليق