अतुल सोनकांबळे
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (ता.इंदापूर) : शुक्रवार दि. २५ रोजीच्या संभाजी भिडे ऊर्फ मनोहर कुलकर्णी यांची जाहिर सभा इंदापूर येथे असुन रायगडावर पुनर्प्रस्थापित होणाऱ्या सुवर्ण सिंहासनाचा खडा पहारा या विषयावर व्याख्यान होणार आहे.
मात्र संभाजी भिडे हे नेहमीच वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहीलेले आहेत. असे भडकावू वक्तव्य करून दगल घडवनार्या भिडेच्या सभेला परवानगी देऊ नये असे निवेदन शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी इंदापूर पोलीस स्टेशन, तहसिलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना देऊन सभेचा परवाना रद्द करावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भिमाकोरेगाव दंगलीतील संभाजी भिडे हा मुख्यसूत्रधार असुन माझ्या बागेतील आंबा खाल्यानंतर मुलगा होतो असे वादग्रस्त विधान करून नेहमी वादाच्या भोवर्यात राहीलेले संभाजी भिडे हे इंदापूरात येऊन गरळ ओकनार व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडला तर कार्यक्रमाचे आयोजक पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात नमूद केले आहे.
सामाजिक सलोखा बिघडवणारे आणि बहुजन समाजात खोटा इतिहास पसरवुन जातीय तेढ निर्माण करून सामाजिक शांतता बिघडवणारे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांचा सुवर्ण सिंहासना संदर्भात जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो बहुजन समाजात दिशाभूल निर्माण करून जातीय तेढ निर्माण करणार आहे.
संभाजी भिडे यांची पार्श्वभूमी पाहता ही व्यक्ती चितावणीखोर भाषणे देऊन समाजात अशांतता निर्माण करतात.
इंदापूर शहरात आज पर्यंत सामाजिक सलोख्याचे वातावरण आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनास विनंती आहे की आपण सदर कार्यक्रमास परवानगी नाकारावी.


إرسال تعليق