शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

बीआरटी' मार्गामध्ये रुग्णवाहिका अडकली ; बीआरटी मार्गात इतर वाहनांचा सुळसुळाट

 

बीआरटी ' मार्गाला नागरिकांचा विरोध 


 पुणे नगर रोड बी आर टी मध्ये खाजगी वाहनांची गर्दळ


 बी आरटी मध्ये अडकली रुग्णवाहिका, 


पुणे :  पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बी आर टी बंद करा अशी मागणी पुणे महानगरपालिका व पुणे पीएमपीएमला करून देखील या मागणीला नकार दिला आहे. 

      बी आर टी मार्गामध्ये या वाहतुकीमुळे पोलीस कर्मचाऱ्यांना मात्र चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे.

        पुणे पोलीस आयुक्त अमिताभ यांच्यानंतर आता नगर रोड परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून बीआरटी मार्ग बंद करण्याची मागणी जोर धरू लागली . काही दिवसापूर्वी स्वयंसेवी संस्था आणि वडगाव शेरी परिसरातील नागरिकांनी नगर रोड मार्गावर बीआरटी मार्गाविरोधात आंदोलन करण्यात आले. अर्धवट बीआरटी मार्गामुळे वडगाव शेरी भागात वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी बीआरटी बंदची मागणी केली. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बीआरटी मार्ग बंद करण्याची मागणी केली होती. पोलिसांच्या मागणीनंतर महापालिकेनेही पीएमपीएमएलला पत्र पाठवित बीआरटी बंद करण्याबाबत विचारणा केली. मात्र, पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी बीआरटी मार्ग बंद करण्यास नकार दिला. बीआरटी ही सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधेसाठी असल्याने ती बंद करू नये, अशी भूमिका घेतली होती पीएमपीच्या भूमिकेनंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकार परिषद घेत बीआरटी ही शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीचा महत्वाचा घटक असून ती कोणत्याही स्थितीत बंद केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

           आयुक्तांच्या पत्रकार परिषदेनंतर बीआरटी मार्गावर पडदा पडला असे वाटत असतानाच आता नगर रोड परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत .

Post a Comment

أحدث أقدم