प्रतिनिधी (श्री सुनिल थोरात)
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (हवेली) : दि. ५ व ६ नोव्हेंबर २०२२ रोजी कराटे - दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजनात महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर कराटे स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथे घेण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्यातून या स्पर्धेत ६०० खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये चॅम्पियन्स स्पोर्ट्स कराटे-डो असोसिएशन २८ विद्यार्थी सहभाग नोंदवला.
सुवर्ण ०२ ,रौप्य ०२, कांस्य ०६ अशा झाले. १० पदकांची कमाई व भरघोश यश संपादित केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
👉🏻१२ वर्षे मुली वजन गट - ३५
दिव्या चव्हाण - सुवर्णपदक
👉🏻०९ वर्षे मुली वजन गट - ३५
वैष्णवी सोलापुरे - सुवर्णपदक
👉🏻१३ वर्षे मुले वजन गट - ५० प्रितम गुंजोटे- रौप्यपदक
👉🏻०८ वर्षे मुले वजन गट - २० शौर्य झांजुर्णे - रौप्यपदक
👉🏻११ वर्षे मुले वजन गट + ४५ हंसराज वाघमोडे - कांस्यपदक
👉🏻१३ वर्षे मुले वजन गट + ५५ सार्थक मेमाणे - कांस्यपदक
👉🏻०८ वर्षे मुली वजन गट - ३० ओजस्विनी पुराणिक - कांस्यपदक.
👉🏻१० वर्षे मुली वजन गट - ३५ नंदिनी चव्हाण- कांस्यपदक
👉🏻१३ वर्षे मुले वजन गट - ५५
स्वयंम शेंडगे - कांस्यपदक
👉🏻१२ वर्षे मुले वजन गट + ३५ स्वप्निल पवार - कांस्यपदक
या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वय वजन गटामध्ये यश संपादित केले आहे. या सर्व विद्यार्थी व प्रशिक्षकांचे कौतुक सर्वच क्षेत्रातून होत आहे. या मधून दिव्या चव्हाण आणि वैष्णवी सोलापुरे या दोन विद्यार्थिनींची निवड २ व ३ डिसेंबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी झाली आहे. हे सर्व खेळाडू गोल्डन सियारा पब्लिक स्कूल कवडीपाठ या शाळेत शिकत असून प्रशिक्षक सेन्साई हेमंत डोईफोडे सर यांच्या मार्गदर्शनात कराटे प्रशिक्षण घेत आहेत. या सर्व खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक स्कूल कमिटी चेअरमन शैलेश चंद, प्रिन्सिपल प्रीती खणगे मिस व सर्व शिक्षक यांनी केले. व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या


إرسال تعليق